श्री शिवाजी महाविद्यालयात विद्यार्थी बँकेची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:41 AM2021-08-18T04:41:10+5:302021-08-18T04:41:10+5:30

या बँकेच्या माध्यमातून महाविद्यालयातील गरीब, होतकरू, आर्थिक दृष्टीने दुर्बल, गरजू विद्यार्थ्यांना पदवीस्तरावर शिक्षण घेताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. ...

Establishment of Student Bank in Shri Shivaji College | श्री शिवाजी महाविद्यालयात विद्यार्थी बँकेची स्थापना

श्री शिवाजी महाविद्यालयात विद्यार्थी बँकेची स्थापना

googlenewsNext

या बँकेच्या माध्यमातून महाविद्यालयातील गरीब, होतकरू, आर्थिक दृष्टीने दुर्बल, गरजू विद्यार्थ्यांना पदवीस्तरावर शिक्षण घेताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडून द्यावे लागते. त्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा व प्रवेश फी, पुस्तके खरेदीसाठी, एसटीच्या पासकरिता आणि महाविद्यालयीन गणवेश खरेदीसाठी विद्यार्थी बँकेच्या माध्यमातून विनातारण व कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता वर्षभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा परतफेडीच्या अटीवर सहज मदत म्हणून कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. स्वातंत्र्य दिनी महाविद्यालयातील बी. ए. भाग २चा विद्यार्थी विशाल अनिल वले व बी. कॉम. भाग ३ची विद्यार्थिनी तृप्ती गुलाबराव मोरे यांना प्राचार्यांच्या हस्ते प्रत्येकी ५०० रुपये देऊन विद्यार्थी बँकेचे रितसर उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थी विकास बँकेचे समन्वयक प्रा. नागेश गट्टूवार व सहसमन्वयक प्रा. पुरुषोत्तम चाटे आहेत. या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्रा. डॉ. सुनील मामलकर, प्रा. नंदा मास्कर, प्रा. अविनाश मेहेरकर, डॉ. प्रवीण ठेंग, प्रा. दिनेश ढगे, डॉ. चित्रा मोरे, डॉ. सुप्रिया बेहेरे, प्रा. भास्कर भिसे, डॉ. अभय ठाकुर, प्रा. धीरज चन्नेकर, प्रा. पराग ब्राम्हणकर, डॉ. अरुण गवारे, डॉ. राहुल उके, प्रा. नीलेश राहाटे, प्रा. प्रतीक गायकी, प्रा. दादा मनगटे, प्रा. शुभम साखरे, चंद्रकांत शिराळ, पुरुषोत्तम कुयटे, सुभाष धुरंधर, वासुदेव खाडे, महादेव सोनुने, अमोल बढे, महादेव गवई, महाविद्यालयातील माजी विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात उपस्थित होते.

Web Title: Establishment of Student Bank in Shri Shivaji College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.