चाचण्यांमधील चढउतारानंतरही सरासरी ८०७ जण होताहेत बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:36 AM2021-05-07T04:36:38+5:302021-05-07T04:36:38+5:30
--ग्रामीण भागात चाचण्या कमी-- एका अंदाजानुसार जिल्ह्यातील शहरी भागात जवळपास ५५ टक्क्यांच्या आसपास रुग्ण सापडून येत असले तरी ग्रामीण ...
--ग्रामीण भागात चाचण्या कमी--
एका अंदाजानुसार जिल्ह्यातील शहरी भागात जवळपास ५५ टक्क्यांच्या आसपास रुग्ण सापडून येत असले तरी ग्रामीण भागातही हे प्रमाण वाढत आहे. त्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याची अवश्यकता व्यक्त होत आहे. नाही म्हणायला आता आरोग्य विभागाने ग्रामीण भागात कोरोना चाचण्यांसाठी गावातच थेट शिबिर घेण्यास प्रारंभ केला आहे. मात्र त्याची व्याप्ती वाढविण्याची गरज आहे. तपासणी झालेले अहवाल त्वरित संबंधितांना मिळाल्यास उपाययोजना होऊन कोरोना नियंत्रणात आणण्यास मदत होईल.
--रॅपिड टेस्टवर जोर--
गेल्या १३ महिन्यात जिल्ह्यातील ४ लाख ६३ हजार ५१ नागरिकांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी ५२ टक्के चाचण्यांसाठी रॅपिड टेस्ट किटचा वापर करण्यात आला तर आरटीपीसीआरद्वारे ४५ टक्के नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. ट्रुनॅटद्वारे अवघ्या तीन टक्के नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.