कोरोना संकटातही एस.टी.चे अधिकारी, कर्मचारी कर्तव्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:33 AM2021-05-15T04:33:29+5:302021-05-15T04:33:29+5:30

चालक-वाहक घरीच कोरोनामुळे सध्या अत्यावश्यक सेवेला फारसा प्रतिसाद नसल्याने महिनाभरापासून चालक-वाहक घरीच आहेत. मात्र असे असले तरी, एसटीचे अधिकारी, ...

Even in the Corona crisis, ST officers, staff on duty | कोरोना संकटातही एस.टी.चे अधिकारी, कर्मचारी कर्तव्यावर

कोरोना संकटातही एस.टी.चे अधिकारी, कर्मचारी कर्तव्यावर

Next

चालक-वाहक घरीच

कोरोनामुळे सध्या अत्यावश्यक सेवेला फारसा प्रतिसाद नसल्याने महिनाभरापासून चालक-वाहक घरीच आहेत. मात्र असे असले तरी, एसटीचे अधिकारी, तांत्रिक, यांत्रिक विभागाच्या कर्मचाऱ्यांना मात्र कर्तव्य निभावावेच लागत असल्याचे दिसून येत आहे.

शासनाने यांत्रिकी व प्रशासकीय विभागातील कर्मचाऱ्यांसाठी ३० टक्के उपस्थिती, तर चालक-वाहकांना १५ टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे. सध्या संचारबंदीमुळे प्रवाशांचा एसटी बसला फारसा प्रतिसाद नसल्याने अनेक प्रवासी बसेस बंद आहेत. त्यामुळे बुलडाणा विभागात कामाच्या गरजेनुसारच कर्मचारी उपस्थित राहत आहेत. कोरोनाविषयक काळजी घेण्यात येत आहे.

-ए. यू. कच्छवे, विभागीय वाहतूक अधिकारी, बुलडाणा.

चालक - वाहकांच्या प्रतिक्रिया

१५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमुळे अनेक चालक-वाहकांना सध्या ड्युटी लागत नाहीत. मात्र बसेसही बंद असल्याने आम्हालाही नाइलाजास्तव घरीच थांबावे लागत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आम्हाला कोरोना टाळण्यासाठी काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. लसीकरणही करून घेण्यात आले आहे.

- चालक.

सध्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने शासनाने सर्वच शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना १५ टक्के उपस्थितीचा निर्णय घेतल्याने आम्हालाही आता कमीच वेळा बोलावले जाते. यामुळे कोरोना कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे. संचारबंदीमुळे प्रवासीही बसकडे फिरकत नाहीत. यामुळे एसटीच्या उत्पादनात घट होत आहे.

- वाहक.

जिल्ह्यातील एकूण आगारे

०७

चालक

८९७

वाहक

८०७

Web Title: Even in the Corona crisis, ST officers, staff on duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.