प्रत्येक शेतकऱ्याने एक झाड लावावे - आमदार संजय कुटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 14:41 IST2018-07-01T14:39:22+5:302018-07-01T14:41:10+5:30
त्येक शेतकरी बांधवाने एक तरी झाड आपल्या शेतातील बांधावर लावावे असे आवाहन आमदार डॉ. संजय कुटे यांनी केले.

प्रत्येक शेतकऱ्याने एक झाड लावावे - आमदार संजय कुटे
धानोरा ता. जळगाव जामोद : निसर्ग आणि पर्यावरण हेच जीवनाचे आधार आहे. वृक्ष नाही तर जीवन सुद्धा नाही. वृक्ष कमी होत असल्याने त्याचे गंभीर परिणाम आपणास दिसायला लागले आहेत. वृक्ष नष्ट होत असल्यामुळे पाऊस सुद्धा पडत नाही. पाऊस नसल्याने शेतीची मोठी हानी होत आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवाने एक तरी झाड आपल्या शेतातील बांधावर लावावे असे आवाहन आमदार डॉ. संजय कुटे यांनी केले.
वृक्षारोपणाच्या हरित महाकुंभात जळगांव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात रविवारी, १ जुलैरोजी वनमहोत्सवानिमित्य ‘चला वृक्षारोपण करुया, महाराष्ट्राचे भविष्य हरित करुया’ हा नारा घेवुन १३ कोटी वृक्षलागवड उपक्रमाचा शुभारंभ रविवारी सकाळी ११ वाजता राजूरा, बीट हनवतखेडमध्ये डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते झाला. यावेळी वृक्षारोपणाचे महत्व सांगतांना ते बोलत होते. प्रारंभी आ.डॉ.संजय कुटे यांनी वृक्षपूजा करून मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी ग्रामस्थांना वृक्षारोपणाचे सांगत प्रत्येकाने आपल्या शेताच्या बांधावर वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले. यावेळी उमपूर ग्रामपंचायतच्या सरपंच रेवती राजकुमार गौतम यांच्यासह जिल्हा परिषद सदस्या मंजुषाताई तिवारी,आसलगांव पं.स.सदस्य, एकनाथ वनारे, तहसिलदार डॉ.शिवाजी मगर, जळगांव (जा.) चे ठाणेदार प्रदिप साळुंके ,वनपरिक्षेत्र अधिकारी कांबळे, त्यांचे सर्व सहकारी , मंजितसिह शीख, इतर विभागाचे सरकारी कर्मचारी, सन्मान टीमचे स्वयंसेवक व धानोरा ,वडगाव,हणवतखेड, उमापूर चारबन,गारपेट व राजुरा आदी गावातील नागरिकांची उपस्थिती होती.