ग्रामगीतेचे अवलोकन केल्यास प्रत्येक गाव आदर्श बनू शकते : आकाश फुंडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 03:07 PM2018-11-19T15:07:39+5:302018-11-19T15:08:00+5:30
माटरगाव येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५० वा महापुण्यतिथी उत्सव लोकमत न्युज नेटवर्क खामगाव : राष्ट्रसंतांचा विचार ग्रामगीतेच्या माध्यमातून ...
माटरगाव येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५० वा महापुण्यतिथी उत्सव
लोकमत न्युज नेटवर्क
खामगाव : राष्ट्रसंतांचा विचार ग्रामगीतेच्या माध्यमातून सर्वत्र पोहोचला पाहिजे. गावाचे नियोजन व सहभाग ग्रामगीतेत सांगितल्याप्रमाणे केल्यास आदर्श गावाची निर्मिती प्रत्येक गावात होऊ शकते, असे प्रतिपादन आमदार आकाश फुंडकर यांनी केले. माटरगाव येथे १८ नोव्हेंबर रोजी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५० वा महापुण्यतिथी उत्सव पार पडला त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी आचार्य वेरुळकर गुरुजी होते. तर मंचावर आमदार अॅड. आकाश फुंडकर यांचेसह जिल्हा परिषद सदस्या स्वातीताई देवचे, माजी जि प बांधकाम सभापती सुरेशभाऊ वनारे, भाजप तालुका अध्यक्ष राजेंद्र देवचे, अनंतराव आळशी, पंचायत समिती सदस्य रायातुल्लाह खान, सरपंच सौ शुद्धमती निखाडे, ह.भ.प भिकाजी मिरगे, ह.भ.प गजानन देवचे, गोपाळराव मिरगे, समाधान ठाकरे, त्रंबकराव आळशी, डॉ वराडे, भगवान भोजने, शिवाजी वानखडे, किसनराव दळवी, रामकृष्ण मारके, प्रल्हाद वाघ, वासुदेव काळे , सुखदेव कुसुंबे, भाऊसाहेब लांडे , तुळशीराम आळशी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्मरण केले. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मौल्यवान विचार ग्रामगीता मध्ये आहेत. ग्रामगीतेत जीवनाचे सार आहेत, याचे अवलोकन करून त्याप्रमाणे जगल्यास आपले जीवनातील सर्व समस्या दूर होतील. तसेच समाजाचेही सार्थक होईल. ५७ वर्षाआधी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पावन स्पर्श माटरगावला लाभले , त्यांनी येथे सेवा दिली, अश्या पावन ठिकाणी महाराजांचा ५० व्या पुण्यतिथी सोहळ्यात उपस्तीत राहण्याचा लाभ मिळाला याचे मी धन्य मानतो. गुरुदेव सेवा मंडळ चांगले समजोपयोगी कार्य करत आहेत, असेच कार्य त्यांचे हातून घडत राहो , मंडळाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असेही ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे सहवासात समाजकार्य करणाºया जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामगीता वाचन करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.