कोरोना लसीकरणासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा : शिंगणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:41 AM2021-09-08T04:41:16+5:302021-09-08T04:41:16+5:30
साखरखेर्डा येथे ९७० नागरिकांचे आणि युवकांचे लसीकरण करण्यात आले होते. लसीकरणाला वेग येऊन लवकरात लवकर लसीकरण व्हावे, म्हणून ७ ...
साखरखेर्डा येथे ९७० नागरिकांचे आणि युवकांचे लसीकरण करण्यात आले होते. लसीकरणाला वेग येऊन लवकरात लवकर लसीकरण व्हावे, म्हणून ७ सप्टेंबर रोजी लसीकरण कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या लसीकरण केंद्राला मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी भेट दिली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राम जाधव, माजी कृषी सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य दिनकरराव देशमुख, माजी सभापती राजू ठोके, गजानन बंगाळे, सरपंच दाऊत कुरेशी, ग्रामपंचायत सदस्य सय्यद रफीक, रामदाससिंग राजपूत, शिंदीचे सरपंच विनोद खरात, संजय पंचाळ, तोताराम ठोसरे, दत्तुआजा ठोसरे, विलास आबा रिंढे, शिवदास खरात, कमलाकर गवई, दत्ता घोडके, भानुदास लव्हाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सावळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सुरुशे आदी उपस्थित होते.
लसीकरणाला प्रतिसाद
साखरखेर्डा येथील कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. कोरोना नियमांचे पालन करुन सर्वांनी लसीकरणाचा लाभ घेतला. लसीकरण केंद्राला डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी भेट दिल्यानंतर उपस्थितांशी त्यांची चर्चा केली.