खामगाव न्यायालयात व्हिसीद्वारे नोंदवला पुरावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 12:01 PM2020-06-24T12:01:09+5:302020-06-24T12:01:26+5:30
खामगाव येथील अतीरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात लॉकडाऊन नंतर प्रथमच व्हिसी द्वारे पुरावा नोंदविण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : खामगाव येथील अतीरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात लॉकडाऊन नंतर प्रथमच व्हिसी द्वारे पुरावा नोंदविण्यात आला.
२३ जून २०२० रोजी तब्बल तिन महिन्यानंतर पहिल्यांदा वि. अतीरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. आर डी देशपांडे खामगांव यांनी बाल लैंगिक अत्याचाराच्या अतिमहत्वाच्या प्रकरणात, प्रकरणातील तपास अधिकारी, श्रीमती रूपाली दरेकर सहाय्यक पोलीस आयुक्त सोलापूर यांचा पुरावा व्हिसी द्वारे नोंदविला. त्याकामी अति. शासकिय अभियोक्ता रजनी बावस्कार, आरोपीचे वकील श्री. व्हि, वाय. देशमुख, न्यायालयीन कर्मचारी कनिष्ठ लिपीक प्रविणखडसे, स्टेनोग्राफर धनंजय म्हात्रे, संगणक तंत्रज्ञ प्रशांत जोहरे,जितुसिंग बिल्लारे,व स्वप्निल बोचरे यांचे विशेष सहकार्य लाभले.
१७ मार्च २० रोजी वि. उच्चन्यालयाचे कोव्हीड १९ च्या धरतीवर आलेल्या आदेशा नुसार कामकाज थांबले व कोरोना व्हायरस मुळे आलेल्या व्यत्ययामुळे थांबलेला पुरावा आज तब्बल तिन महिन्यानंतर पुर्ण झाला. वि. उच्चन्यालयाचे आदेशानुसा लॉकडावून च्या काळात केवळ अतिआवश्यक प्रकरण जसे की जमानत अर्ज,रिमांड,इत्यादी वगळता सर्व न्यायालयिन कामकाज कोरोना विषाणुच्या प्रदुर्भाव टाळण्याच्या अनुशंगाने बंद होते.. आणि त्यामुळे प्रकरणातील पुरावा नोंदविण्याचे कामकाज थाबलेले होते.. परंतु दिर्घकालीन लाकडावून असल्याने पुर्णत: हटवणे सद्या तरी शक्य नाही, म्हणुन सर्व बाबींचा विचार करून वि. उच्च न्यायालयाने ८ जुन २० पासुन न्यायालयिन कामकाज सकाळी १०.३० ते १.०० व दुपारी २.३० ते ५.३० असे दोन पाळ्यांमधे सुरू करण्याचे निर्देश दिलेले आहे. तसेच शक्यतोवर फियार्दी, आरोपी, व पक्षकार यांना न्यायालयात न बोलवता व्हिडीओ कान्फरंसी द्वारे पुरावा नोंदविण्याचे परवानगी व तसे निर्देश वि उच्च न्यायालयाने घालून दिले आहेत. त्यानुसार अतिमहत्वाच्या प्रकरणात पुर्ववत कामकाज सुरू करण्यात आले.