परीक्षा केंद्रांची होणार चाचपणी!
By admin | Published: March 11, 2017 01:30 AM2017-03-11T01:30:00+5:302017-03-11T01:30:00+5:30
लोकमतच्या वृत्ताची शिक्षण विभागाने घेतली दखल.
बुलडाणा, दि. १0- बोर्डाच्या नियमानुसार दहावीच्या सर्वच परीक्षा केंद्रांवर शंभर टक्के मोबाइल बंद व सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मात्र काही परीक्षा केंद्रांवरील त्रुटी ह्यलोकमतह्णने स्टिंग ऑपरेशन करून उघडकीस आणल्या. याची दखल घेत, शिक्षण विभागाने दहावीच्या सर्वच परीक्षा केंद्रांवर सुरक्षेच्या दृष्टीने चाचपणी सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणार्या दहावीच्या परीक्षेला ७ मार्चपासून सुरुवात झाली आहे. ९ मार्च रोजी हिंदीचा पेपर असताना बुलडाणा शहरासह धाड व मोताळा येथील काही परीक्षा केंद्रांवर स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. जवळपास सर्व केंद्रांवर मोबाइल बंदी होती. मात्र, बर्याच परीक्षा केंद्रांवर बैठे पथक वेळेपर्यंंंंत उपस्थित होत नसल्याची बाब पुढे आली. याबाबत दखल घेत, जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर नियमांचे कडक पालन आदेश देण्यात आले असून, सर्व केंद्रांची वेळोवेळी चाचपणी होणार आहे. सर्वच परीक्षा केंद्र सुरक्षित आहेत. मात्र, ग्रामीण भागातील काही परीक्षा केंद्रांवरील अनुचित प्रकार टाळण्यासाठी बैठे पथक व शिक्षण विभाग विशेष लक्ष देत असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी ए.जे. सोनावणे यांनी दिली आहे.