बुलडाण्यात टिईटी परिक्षेपासून परीक्षार्थी वंचीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 11:19 PM2017-07-22T23:19:34+5:302017-07-22T23:24:32+5:30
जिल्हाधिका-यांकडे तक्रार;१५ ते २0 विद्यार्थी टिईटीपासून वंचीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शिक्षक पात्रता परिक्षेला वेळ झाला म्हणून परीक्षेस बसु न दिल्याने १५ ते २0 विद्यार्थी टिईटीपासून वंचीत राहिल्याची तक्रार काही परीक्षार्थींनी जिल्हाधिकार्यांकडे २२ जुलै रोजी निवेदनाद्वारे केली. बुलडाणा जिल्ह्यात २१ परीक्षा केंद्रावर या परीक्षा घेण्यात आल्या. परंतू शिक्षक पात्रता परीक्षेसाठी २२ जुलै रोजी सकाळी १0 वा. २५ मिनीटांनी श्री शिवाजी विद्यालय व लद्धड पॉलिटेक्नीक कॉलेज बुलडाणा या सेंटवर जवळपास १५ ते २0 विद्यार्थी हजर होते. परंतु त्यांनी सदर वेळेमध्ये आतमध्ये घेतले नाही. परीक्षेची वेळ ही १0.३0 होती; परंतु सदर वेळेचे आतमध्ये विद्यार्थी तेथे हजर असुनही सेंटरवरील अधिकार्यांनी त्यांना परीक्षेस बसु दिले नाही. पेपरला न बसल्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षेपासून विद्यार्थी वंचित राहिले. तरी यासंदर्भात गांभीर्याने विचार करून न्याय द्यावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परीक्षेस वंचित राहिलेले १५ ते २0 विद्यार्थी आत्मदहन करतील, असा इशारा सतिश खुशालराव आरमाळ, समाधान बळीराम इंगळे, दीपक सुधाकर साबे, राहुल राजीव राहाटे, प्रमोद शिवाजी आरमाळ, राजेंद्र नामदेव प्रधान, जनक प्रल्हाद वाडेकर, विजय देविदास नारद, संदीप श्रीधर अवचार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.