परवानगीपेक्षा जास्त रेतीचे उत्खनन व साठवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 19:32 IST2021-06-26T19:32:30+5:302021-06-26T19:32:46+5:30
Excavation and storage of excess sand : शेगाव, संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील ४ रेती साठे ९ ठिय्यांचे नव्याने स्थळनिरिक्षण आणि पंचनामे करण्यात आले.

परवानगीपेक्षा जास्त रेतीचे उत्खनन व साठवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन वाढीस लागले असतानाच, गौण खनिज उत्खननाची परवानगी असलेल्या रेतीसाठ्यातून क्षमतेपेक्षा अधिक गौण खनिजाचे उत्खनन आणि साठवणूक करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उजेडात आला. शेगाव, संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील ४ रेती साठे ९ ठिय्यांचे नव्याने स्थळनिरिक्षण आणि पंचनामे करण्यात आले. त्यामुळे रेती माफीया आणि महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
- शेगाव, संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील रेती घाटातून क्षमतेपेक्षा रेतीचा उपसा केल्या जात असल्याची तक्रार माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली. या तक्रारीच्या अनुषंगाने महसूल मंत्री यांनी जिल्हाधिकाºयांना तात्काळ स्थळ निरिक्षण करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हाधिकाºयांनी महसूल प्रशासनाला रेती घाट, रेती साठवणुकीचे ठिय्ये यांचे नव्याने स्थळ निरिक्षण आणि पंचनामे करण्याचे आदेश दिले. यामध्ये शेगाव तालुक्यातील बोंडगाव रेती घाट, सोगोडा रेती घाट, संग्रामपूर तालुक्यातील ईटखेड रेती घाट आणि जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ रेती घाटातून परवानगी पेक्षा अधिक रेतीची उचल करण्यात आल्याचे समोर आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने विविध रेती साठे आणि रेती घाटांचा पंचनामा तसेच जीपीएस यंत्रणेद्वारे तांत्रिक तपासणी केली. शनिवारी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या धडक कारवाईत खामगावचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, जळगाव येथील उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, शेगाव तहसीलदार शिल्पा बोबडे, संग्रामपूर येथील उपविभागीय अधिकारी तथा परिविक्षाधिन अधिकारी तेजश्री कोरे, संग्रामपूरचे तहसीलदार विजय चव्हाण, बांधकाम विभागाचे ढाकणे, मंडळ अधिकारी चांभारे, मंडळ अधिकारी जी.आय.राऊत, तलाठी पी.एम.नलावडे, तलाठी डाबेराव, पोलिस पाटील गोपाल सोळंके, चालक सातभाकरे यांच्यासह जलंबचे ठाणेदार धीरज बांडे, शेगाव ग्रामीणचे ठाणेदार गोकुळ सूर्यवंशी, रविंद्र लांडे, वनविभागाचे पी.जी.सानप यांच्यासह महसूल, वन विभागाच्या अधिकाºयांनी चोख पोलिस बंदोबस्तात ही धडक कारवाई केली.