पाझर तलावाच्या भिंतीजवळ उत्खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 18:27 IST2019-04-10T18:26:55+5:302019-04-10T18:27:05+5:30
मेहकर: तालुक्यातील आंध्रुड येथील शासकीय पाझर तलावाच्या सांडव्याच्या मुख्य भिंतीजवळ बेकायदेशीर पणे उत्खनन करून शासकीय मालमत्तेचे नुकसान होत असल्याची तक्रार आंध्रुड येथील सरपंच आश्विनी देशमुख यांनी मंगळवारी तहसीलदारांकडे केली आहे.

पाझर तलावाच्या भिंतीजवळ उत्खनन
मेहकर: तालुक्यातील आंध्रुड येथील शासकीय पाझर तलावाच्या सांडव्याच्या मुख्य भिंतीजवळ बेकायदेशीर पणे उत्खनन करून शासकीय मालमत्तेचे नुकसान होत असल्याची तक्रार आंध्रुड येथील सरपंच आश्विनी देशमुख यांनी मंगळवारी तहसीलदारांकडे केली आहे. समृद्धी महामार्गासाठी लागणाºया मुरूमासाठी हे उत्खनन होत असून याचा पाझर तालावाला धोका निर्माण झाला आहे.
तालुक्यातील आंध्रुड गावावरून समृद्धी महामार्ग जात असून या महामार्गाच्या कामाला सध्या वेग आला आहे. या महामार्गास लागणारे गौण खनिज शासनाने प्रस्तावित केलेल्या जागेवरूनच उचलावे त्यानुसार संबंधित अधिकाºयांनी संबंधित कंपनीला सीमा निश्चित करून दिल्या आहेत. तरीसुद्धा ठराविक नेमून दिलेल्या जागेवरून गौण खनिज न उचलता शासकीय पाझर तलावाच्या मुख्य भिंतीजवळ व सांडव्या जवळ गौण खनिज उचलल्या जात आहे. त्यामुळे शासनाने तयार केलेल्या पाझर तलावाला संभाव्य धोका निर्माण झालेला आहे. यामुळे पाझर तलाव निकामी होऊ शकतो. या पाझर तलावात पाणी थांबणार नाही. त्यामुळे गावाचे तर नुकसान होईल. शिवाय जनावरांना पिण्याला पाणी सुद्धा राहणार नाही. सद्यस्थितीत पाणीटंचाई निर्माण झाली आहे व पाझर तलावाचे हे नुकसान अडचणीत भर घालणारे आहे. याची दक्षता घेणे आवश्यक आहे. यासोबतच संबंधित कंपनी ग्रामपंचायत हद्दीतील राखीव जागेतून सुद्धा बेकायदेशीरपणे गौण खनिज घेऊन जात असल्याची आरोड परिसरातील नागरिकांमधून होत आहे. येथे झालेल्या बेकायदेशीर गौण खनिज प्रकरणामुळे त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी आंध्रुड येथील सरपंच आश्विनी नंदकिशोर देशमुख यांनी तहसीलदारांकडे केली आहे.
पाणीपुरवठा पाईप लाईनचे नुकसान
या अगोदरही आंध्रुड येथील सरपंचांनी जिल्हाधिकाºयांना नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गाच्या गौण खनिजाच्या उत्खननाबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे. परंतू याची कुठलीच चौकशी न झाली नाही. याबरोबरच समृद्धी महामागार्चे काम करणाºया कंपनीने प्रस्तावित केलेल्या जागेवर गौण खनिज उत्खनन न करता ग्रामपंचायतच्या नाल्याजवळील व ई क्लास जमिनीवर बेकायदेशीरपणा उत्खनन करीत आहे. पाझर तलावा जवळ उत्खनन करून तलावाच्या जलाशयात धोका निर्माण झाला आहे. यासोबतच पाणीपुरवठा पाईप लाईनचेही नुकसान केल्याची तक्रार मेहकर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
आधं्रूड येथील शासकीय पाझर तलावाच्या ठिकाणी झालेल्या उत्खननाबाबत स्वत: चौकशी करतो. याप्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
- डॉ. संजय गरकल, तहसिलदार, मेहकर.