पिकांसाठी युरियाचा अतिवापर धाेकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:23 AM2021-07-20T04:23:46+5:302021-07-20T04:23:46+5:30

सोयाबीन, मूग, उडीद, तूर, चवळी (बरबटी) यासारख्या शेंगावर्गीय द्विदल पिकांच्या मुळांवरील गाठीमध्ये असलेल्या जिवाणूंच्या साहाय्याने हवेतील नत्र शोषून घेऊन ...

Excessive use of urea for crops is alarming | पिकांसाठी युरियाचा अतिवापर धाेकादायक

पिकांसाठी युरियाचा अतिवापर धाेकादायक

Next

सोयाबीन, मूग, उडीद, तूर, चवळी (बरबटी) यासारख्या शेंगावर्गीय द्विदल पिकांच्या मुळांवरील गाठीमध्ये असलेल्या जिवाणूंच्या साहाय्याने हवेतील नत्र शोषून घेऊन ते नत्राची गरज भागवतात.

माळेगाव येथील एकास मारहाण

माेताळा : तालुक्यातील माळेगाव येथे एका ५० वर्षीय व्यक्तीस मारहाण झाल्याची घटना १७ जुलै रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी

राहेरी : अडगाव राजा येथील रोहित्र जळाल्याने गत पाच दिवसांपासून अर्ध्यापेक्षा जास्त गाव अंधारात असून, त्यामुळे गावकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

भूजल सर्वेक्षण विभागाचा सुवर्ण महाेत्सव

बुलडाणा : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने १६ जुलै रोजी सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन साजरा केला. वेबिनारमार्फत जल साक्षरता अभियान सर्वस्तरावर पोहोचवण्यासाठी गटविकास अधिकारी, तहसीलदार, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, जलसुरक्षक, भूगोल व भूगर्भशास्त्र विषयाचे विद्यार्थी यांना जल साक्षरता, भूजलाचे पुनर्भरण, पाण्याचा ताळेबंद, भूजल अधिनियम कायदा व त्यांचे विनियमन यासंबंधी सर्व माहिती देण्यात आली.

मंगरूळ येथे जुगारावर धाड

अंढेरा : मंगरूळ गावाच्या शेजारील टिनशेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर अंढेरा पोलिसांनी धाड टाकत ९ व्यक्तींना जुगार खेळताना रंगेहाथ पकडल्याची घटना १७ जुलै रोजी घडली. ठाणेदार राजवंत आठवले यांना उपरोक्त ठिकाणी जुगार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली हाेती़

तालुका उपकेंद्र सुरू करण्याची मागणी

बुलडाणा : बांधकाम कामगार यांच्या मुलीच्या विवाहासाठी ५१ हजार रुपये अर्थसाहाय्य त्वरित लागू करा, तालुका स्तरावर कामगार सुविधा केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी बबन वासुदेव गादे यांच्यासह कामगारांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.

Web Title: Excessive use of urea for crops is alarming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.