अनुराधा अभियांत्रिकीत वेबिनार उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:23 AM2021-06-20T04:23:51+5:302021-06-20T04:23:51+5:30
'सॉफ्टवेअर टेस्टिंगचे बेसिक्स, टेस्टिंग टाइप, टेस्टिंगचे कार्य प्रकार, फंक्शनल व नॉन फंक्शनल टेस्टिंग, टेस्टिंगचा कल आणि नोकरीच्या संधी याबाबत ...
'सॉफ्टवेअर टेस्टिंगचे बेसिक्स, टेस्टिंग टाइप, टेस्टिंगचे कार्य प्रकार, फंक्शनल व नॉन फंक्शनल टेस्टिंग, टेस्टिंगचा कल आणि नोकरीच्या संधी याबाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन लाभावे, या हेतूने या वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महाजन यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करतानाच आयटी उद्योगात चांगली नोकरी मिळविण्यासाठी व्यावहारिक कौशल्य, संप्रेषण, ई-मेल लेखन आणि व्यक्तिमत्त्व या बाबी आवश्यक असल्याने त्या विद्यार्थ्यांनी आत्मसात कराव्यात, असे सांगितले. माहिती व तंत्रज्ञान, संगणक विज्ञान व अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार अभियांत्रिकीच्या सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी याचा ऑनलाइन पद्धतीने लाभ घेतला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अरुण नन्हई यांनी केले. वेबिनारसाठी डॉ. आर.बी. मापारी, डॉ. आर.जी. कोकाटे, डॉ. अविनाश कापसे, डॉ. के.एच. वळसे, प्रा. यू.एम. मोहोड, प्रा. व्ही.डी. गुरूदासानी यांच्यासह उपस्थितीत विद्यार्थी व शिक्षकांनी प्रश्नोत्तराच्या सत्रात सहभाग नोंदविला. समन्वयक प्रा. पी.एस. इंगले, प्रा. पी.टी. तलोले, प्रा. एस.टी. सावळे, प्रा. एन.एन. कुंभार आणि गजानन लागे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मृणाल धांडे आणि सलोनी जयस्वाल यांनी केले.