पेटेंट फ्री व्हॅक्सिन संकल्प कार्यक्रम उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:23 AM2021-06-23T04:23:04+5:302021-06-23T04:23:04+5:30
सध्या जगावर कोरोना महामारीचे महाभयंकर संकट आहे. मृत्यूचे तांडव सुरू आहे. यावरील उपाय म्हणजे लसीकरण आहे. लस उत्पादन ...
सध्या जगावर कोरोना महामारीचे महाभयंकर संकट आहे. मृत्यूचे तांडव सुरू आहे. यावरील उपाय म्हणजे लसीकरण आहे. लस उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या पेटेंटमुळे अन्य कंपन्या याचे उत्पादन करू शकत नाही. जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेत लसीचे उत्पादन अत्यल्प आहे. त्यामुळे लसीकरण वेगाने होऊ शकत नाही. जोपर्यंत सर्वांचे लसीकरण होणार नाही, तोपर्यंत या संकटावर मानवजात मात करू शकणार नाही. त्यामुळे मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करून पेटेंट फ्री व्हॅक्सिन करावी, असे मत स्वदेशी जागरण मंचचे जिल्हा सहसंयोजक हर्षल सोमण यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमापूर्वी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर मंचच्या कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन जनजागृती केली. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर कार्यवाह प्राचार्य सुधीर मुळे यांनी विश्वमांगल्याचा विचार करून जागतिक आरोग्य संघटनेने भूमिका ठरवावी. विकसित देशांना त्याप्रमाणे निर्देश द्यावे. व्हॅक्सिन पेटेंट फ्री करावी, असे विचार मांडले. काेरोना नियमांचे पालन करून हा जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर क्षीरसागर यांनी केले. ऑनलाईन कार्यक्रमाचे नियोजन, संचालन करून स्वदेशी जागरण मंचाचे जिल्हा सहसंयोजक पंकज किंबहुने यांनी आभार मानले.