लाेणार येथे रानभाज्या महाेत्सव उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:39 AM2021-08-14T04:39:40+5:302021-08-14T04:39:40+5:30
लाेणार : जागतिक आदिवासी दिनानिमित्त तालुका कृषी अधिकारी कार्यालय लोणार यांच्या वतीने पंचायत समिती आवारात रानभाजी ...
लाेणार : जागतिक आदिवासी दिनानिमित्त तालुका कृषी अधिकारी कार्यालय लोणार यांच्या वतीने पंचायत समिती आवारात रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
रानभाज्या ह्या नैसर्गिक येत असतात त्यावर कुठलीही रासायनिक औषधीची किंवा कीटकनाशकाची रासायनिक बुरशीनाशकांची फवारणी करण्यात येत नाही़ तसेच रानभाज्यामध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे त्याचे मानवी आहारात खूप असे महत्व आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन लोणार पंचायत समिती उपसभापती मदन सुटे यांचे हस्ते करण्यात आले़ यावेळी महोत्सवामध्ये परिसरातील शेतकरी बांधवांनी रानभाज्यांचे प्रदर्शनासाठी स्टाॅल मांडले होते़ प्रदर्शनामध्ये करटुली, अळु, तादुंळजा, केना, चिल, गुळवेल, तरोठा, पाथरी, सुरण, बिट अशा अनेक रानभाज्या प्रदर्शनासाठी ठेवल्या होत्या. कृषी अधिकारी शिवाजीराव कावरखे यांनी रानभाज्या विषयी माहीती व मानवी आहारात त्या कशा उपयुक्त आहेत याचे महत्व पटवून सांगितले़ पंचायत समिती सदस्य यांचे हस्ते प्रदर्शनात उपस्थित असलेल्या शेतकरी बांधवांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले़ तालुका कृषी अधिकारी वैभव दिघे, मंडळ कृषी अधिकारी बिबी रवी राठोड, मंडळ कृषी अधिकारी लोणार, विजय सरोदे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा विशालजी बुरेवार कृषी पर्यवेक्षक जाधव, सिरसाट कृषी सहायक जाधव घायाळ दंदाले कुटे सह सर्व कृषी विभागाचे कर्मचारी तालुक्यातील सर्व कृषी मित्र बरेच शेतकरी बांधव उपस्थित होते.