मालमत्ता करावरील पठाणी व्याज माफ करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:34 AM2021-01-20T04:34:21+5:302021-01-20T04:34:21+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रवींद्र तोडकर यांच्या नेतृत्वात १९ जानेवारी रोजी न. प. मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. कोरोना महामारीमुळे ...

Excuse interest on property tax! | मालमत्ता करावरील पठाणी व्याज माफ करा !

मालमत्ता करावरील पठाणी व्याज माफ करा !

Next

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रवींद्र तोडकर यांच्या नेतृत्वात १९ जानेवारी रोजी न. प. मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. कोरोना महामारीमुळे सर्वांवर आर्थिक संकट उभे राहिले आहे, अनेकांचे रोजगार गेले आहेत, व्यवसाय बुडाले आहेत. अशा परिस्थितीत चिखली नगर परिषदेने जनतेला मालमत्ता कर व इतर करांमध्ये दिलासा देणे आवश्यक आहे. मात्र, नगर परिषदेचे पठाणी व्याज वसूल करणे सुरूच आहे व आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेची लूट होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, नगर परिषदेने ही लूट तातडीने न थांबविल्यास शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यावेळी राकाँ प्रदेश प्रतिनिधी शंतनू बोंद्रे, पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे स्वीय सहायक संतोष लोखंडे, शहराध्यक्ष रवींद्र तोडकर, रायुकाँ जिल्हाध्यक्ष शेखर बोंद्रे, नगरसेवक डॉ. प्रकाश शिंगणे, शहर उपाध्यक्ष युसूफ शेख, रहीम पठाण, प्रमोद चिंचोले, प्रमोद पाटील, दीपक कदम, प्रशांत डोंगरदिवे, डॉ. खलसे, नसिर खान कुरेशी, दिनकर बोर्डे, अनंत वानखेडे, सय्यद नासिर, शफी खान कुरेशी, जुम्मा चौधरी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, या निवेदनाची दखल घेत मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांनी या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

Web Title: Excuse interest on property tax!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.