सैनिकांना मालमत्ता करामध्ये सूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:08 AM2021-07-13T04:08:22+5:302021-07-13T04:08:22+5:30

निवासी शाळेत प्रवेशप्रक्रिया सुरू बुलडाणा : चिखली तालुक्यातील वळती येथे नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर अनुसूचित जाती प्रवर्गातील मुलांची शासकीय निवासी ...

Exemption in property tax to soldiers | सैनिकांना मालमत्ता करामध्ये सूट

सैनिकांना मालमत्ता करामध्ये सूट

Next

निवासी शाळेत प्रवेशप्रक्रिया सुरू

बुलडाणा : चिखली तालुक्यातील वळती येथे नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर अनुसूचित जाती प्रवर्गातील मुलांची शासकीय निवासी शाळा आहे. या शाळेत शैक्षणिक सत्र २०२१-२२ साठी प्रवेशप्रक्रिया सुरू झालेली आहे. शाळेमध्ये वर्ग ६ ते १०च्या सेमी इंग्रजी माध्यमाच्या रिक्त जागांसाठी मोफत प्रवेश सुरू झालेले आहेत.

देऊळगाव राजा येथे आरटीओचे शिबिर

बुलडाणा : जुलै ते डिसेंबरदरम्यान राबविण्यात येणारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तालुका शिबिर दौरा सुरू करण्यात आला आहे. शिबिराच्या ठिकाणी मोटार वाहन निरीक्षक व सहाय्यक रोखपाल हजर राहणार आहेत. देऊळगाव राजा येथे १५ जुलै रोजी हे शिबिर होणार आहे.

आशा वर्कर्सच्या अनेक मागण्या प्रलंबित

बुलडाणा : आशा वर्कर्सच्या अनेक मागण्या शासनदरबारी प्रलंबित आहेत. पंतप्रधान मातृत्व वंदना योजनेचा मोबदला देण्यात यावा. आशा, गटप्रवर्तकांकडून विना मोबदला काम करून घेऊ नये, मासिक मिटिंगव्यतिरिक्त तालुका, जिल्हा स्तरावर बोलावू नये व बोलावल्यास प्रवास भत्ता द्यावा, आदी मागण्या करण्यात येत आहेत.

डोणगाव येथे वाहतुकीची कोंडी

डोणगाव : येथील बसथांब्याच्या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. डोणगाव हे राज्य महामार्गावरचे गाव असल्याने येथे वाहनांची नेहमी वर्दळ असते. परंतु वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांसह प्रवाशी हैराण झाले आहेत.

Web Title: Exemption in property tax to soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.