योजनेच्या लाभासाठी निराधारांची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:52 AM2021-01-08T05:52:53+5:302021-01-08T05:52:53+5:30
श्रावण बाळ, संजग गांधी व इंदिरा गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षाच्या शेवटी हयातीचा दाखला जमा करावा लागतो. त्यासाठी नोव्हेंबपर्यंत ...
श्रावण बाळ, संजग गांधी व इंदिरा गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षाच्या शेवटी हयातीचा दाखला जमा करावा लागतो. त्यासाठी नोव्हेंबपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यात आता मुदत वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यातील बँकांमध्ये तहसील कार्यालयांकडून येणाऱ्या यादीनुसार आलेल्या निधीनुसार श्रावण बाळ, संजग गांधी व इंदिरा गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांचा लाभ देण्यात येतो. परंतु वर्षाच्या शेवटी लागणारे हयातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी या लाभार्थ्यांना एकप्रकारची कसरत करावी लागत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुळे ही प्रक्रिया लांबली आहे.
हयातीचा दाखला सादर करण्यास मुदतवाढ
बुलडाणा : निवृत्तिवेतन नियमित मिळण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबरमध्ये जिल्हा कोषागार कार्यालयाच्या वतीने संबंधित बँकेच्यामार्फत हयातीचा फॉर्म भरून घेतल्या जातो. मात्र यावर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याकारणाने हयातीचा दाखला सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता निवृत्तिवेतनधारक २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत संबंधित बँक शाखेत हयातीचा दाखल सादर करू शकतात. सर्व निवृत्तिवेतनधारकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
निराधारांना द्यावा लागणाऱ्या हयातीच्या दाखल्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. हयातीचा दाखला तलाठ्याकडे जमा करावा लागतो. निराधारांना मिळणारे त्यांच्या योजनेचे पैसे बँकेकडे जमा होताच, बँकेतून तातडीने लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केले जातात.
- नरेश हेडाऊ, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक, बुलडाणा.
प्रशासनाकडून हयातीच्या दाखल्यासाठी नवीन अर्ज दिलेला नाही. हयातीच्या दाखल्यांबाबत कुठलाही नवीन बदल झालेला नाही. लाभार्थ्यांना दिलेले जाणारे अनुदानही वेळेवर देण्यात येत आहे. बँकेनेही शासकीय योजनेचा येणारा लाभ तत्काळ द्यावा.
- अश्विनी जाधव, तहसीलदार, संजय गांधी निराधार योजना