कागदपत्रे गाेळा करताना कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:25 AM2021-07-18T04:25:12+5:302021-07-18T04:25:12+5:30
काेराेना संक्रमणामुळे राज्य शासनाने निर्बंध लावण्यात आलेले आहेत़ ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये अजूनही बसफेरी सुरू करण्यात आलेली नाही़ ...
काेराेना संक्रमणामुळे राज्य शासनाने निर्बंध लावण्यात आलेले आहेत़ ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये अजूनही बसफेरी सुरू करण्यात आलेली नाही़ त्यामुळे कागदपत्रे गाेळा करताना विद्यार्थ्यांना कसरत करावी लागत आहे़ दहावीचा निकाल जाहीर झाला असला तरी गुणपत्रिकांची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे तसेच तहसील कार्यालयांमध्येही फेऱ्या माराव्या लागत आहेत.
दहावीचा निकाल लागल्यानंतर गुणपत्रिकांची प्रतीक्षा आहे़ तसेच विविध कागदपत्रे काढण्यासाठी सध्या विविध निर्बंधामुळे त्रास सहन करावा लागत आहे़ निकाल लागण्यापूर्वीच प्रक्रिया सुरू केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे़
पायल वानखडे, विद्यार्थिनी
दहावीचा निकाल जाहीर हाेण्यापूर्वीच पाॅलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे़ त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे़ काेराेनामुळे कागदपत्रे गाेळा करताना विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे़ बस बंद असल्याने तालुक्याच्या ठिकाणी पाेहोचण्यासाठी कसरत करावी लागत आहे़
सतीश इंगळे, विद्यार्थी