लग्नाचे अमिष देवून अल्पवयीन मुलीचे शोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 05:25 PM2019-01-23T17:25:56+5:302019-01-23T17:26:36+5:30

मलकापूर : लग्नाचे अमिष देवून एका अल्पवयीन मुलीवर चार वर्षे बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार येथील पारपेठ भागात मंगळवारी उघडकीस आला.

Exploitation of a minor girl by giving assurance to marriage | लग्नाचे अमिष देवून अल्पवयीन मुलीचे शोषण

लग्नाचे अमिष देवून अल्पवयीन मुलीचे शोषण

Next

मलकापूर : लग्नाचे अमिष देवून एका अल्पवयीन मुलीवर चार वर्षे बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार येथील पारपेठ भागात मंगळवारी उघडकीस आला. या प्रकरणी शहर पोलिसांनी एकाविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले असून आरोपी फरार झाला आहे.
पारपेठ भागातील एका अल्पवयीन मुलीवर सन २०१५ मध्ये २६ वर्षीय तरूणाने अतिप्रसंग केला. यानंतर मागील चार वर्षांपासून हा प्रकार सुरु होता. वारंवार लग्नाचे आमिष देवून अल्पवयीन मुलीचे शोषण करण्यात येत होते. दरम्यान २२ जानेवारी रोजी पिडीत अल्पवयीन मुलीने शेवटचा प्रयत्न म्हणून लग्नासंबंधी चर्चा केली. यावेळी तरूणाने स्पष्ट नकार देवून काढता पाय घेतला. यानंतर मुलीने शहर पोलीसात तक्रार दाखल केली. यावरून मलकापूर शहर पोलिसांनी सादीक शेख हैदर (वय २६) रा.पारपेठ याच्याविरूद्ध अपराध नं.२४/१९ कलम ३७६, २ (जे) (एन) ४५२ भा.द.वी.सहकलम ३, ४, ५ (एल) ६ बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार झाला असून त्याचा शोध सुरु आहे, अशी माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजीवनी दांडगे यांनी दिली (तालुका प्रतिनीधी)

Web Title: Exploitation of a minor girl by giving assurance to marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.