मलकापूर एस.टी.आगारात इलेक्ट्रॉनिक टिकीटिंग मशीनचा स्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 06:50 PM2018-01-27T18:50:33+5:302018-01-27T18:52:09+5:30
मलकापूर : एसटी प्रवासात वाहकाने गावाचे नाव विचारल्यानंतर आणि प्रवाशाने सांगितल्यावर चटकन तिकीट देणाºया इलेक्ट्रॉनिक टिकीटिंग मशीनचा अचानक स्फोट झाल्याची घटना मलकापूर आगारातील विश्रामगृहामध्ये शुक्रवारी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास घडली. त्यात फार मोठी हानी सुदैवाने टळली असून चालक वाहकात मात्र एकच खळबळ उडाली आहे.

फलटण आगाराची मलकापूर मुक्कामी बस शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास येथे पोहचली होती. नेहमीप्रमाणे या गाडीचे चालक देवानंद राजाराम खवले मलकापूर आगाराच्या विश्रामगृहात पोहचले. त्यांच्या शेजारी मुक्ताईनगर आगाराचे चालक वाहक देखील उपस्थित होते. एकंदरीत सर्वजण झोपण्याच्या तयारीत होते. असे असताना मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास देवानंद खले ह्यांच्या ताब्यातील व त्यांनी शेजारी ठेवलेल्या इ.टिआय.एम.मशिनचा स्फोट झाला. त्यामुळे मलकापूर आगाराच्या विश्रामगृहातील चालक व वाहक खडबडून जागे झाले. त्यांनी सुरक्षा रक्षाकडे धाव घेतली. तोवर मशीन जळून खाक झाली होती. या घटनेमुळे सुदैवाने कुठल्याच प्रकारची हानी किंवा फार मोठे नुकसान झालेले नाही. मात्र मशिनच्या अचानक झालेल्या स्फोटामुळे चालक वाहकात एकच खळबळ उडाली आहे.
स्फोट झाल्याची माहिती कळताच घटनेचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर सदरचे मशिन फलटण आगाराला पाठविण्यात आले आहे. सुदैवाने कुठल्याच प्रकारची हाणी झालेली नाही.
- दादाराव दराडे,आगार व्यवस्थापक, मलकापूर