विधी अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:35 AM2021-08-15T04:35:52+5:302021-08-15T04:35:52+5:30

बुलडाणा : विधी अभ्यासक्रमाच्या तीन व पाच वर्षीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सीईटी अनिवार्य केली आहे़ या ...

Extension for CET of law course | विधी अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी मुदतवाढ

विधी अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी मुदतवाढ

Next

बुलडाणा : विधी अभ्यासक्रमाच्या तीन व पाच वर्षीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सीईटी अनिवार्य केली आहे़ या सीईटीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास १७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे़

एलएलबीच्या पाच वर्षीय अभ्यासक्रमासाठी १२ वी उत्तीर्ण अर्ज करू शकतात़ तसेच ३ वर्षीय अभ्यासक्रमासाठी कुठल्याही शाखेचा पदवीधर उत्तीर्ण विद्यार्थी अर्ज करू शकताे़ अर्ज करण्यासाठी १४ ऑगस्ट ते १७ ऑगस्टपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे़ सीईटीसंदर्भात मुकुल वासनिक विधी महाविद्यालयाच्या वतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे़ या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विदर्भ युवक विकास संस्थेचे अध्यक्ष प्रा.डाॅ़ संताेष आंबेकर, प्रभारी प्राचार्य ॲड. डी़ एस़ चव्हाण, प्रा. शिल्पा ठाकरे, ॲड. संताेष वानखेडे, प्रा़ छाया बावणे आदींनी केले आहे़

Web Title: Extension for CET of law course

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.