सीईटी ऑनलाईन प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 01:21 PM2020-09-05T13:21:38+5:302020-09-05T13:21:48+5:30

विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने प्रवेश परीक्षा अर्ज भरण्यास दोन दिवसांची मुदत वाढ दिली आहे.

Extension in filling up the application for CET Online Entrance Exam | सीईटी ऑनलाईन प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

सीईटी ऑनलाईन प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोना संसर्गामुळे शैक्षणिक सत्र विस्कळीत झाले आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सीईटी आॅनलाईन प्रवेश परीक्षेचे अर्ज भरण्यापासून अनेक विद्यार्थी वंचित राहीले होते. काहींनी फी न भरल्याने तर काही विद्यार्थी नोंदणी करू शकले नव्हते. या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने प्रवेश परीक्षा अर्ज भरण्यास दोन दिवसांची मुदत वाढ दिली आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
राज्य सामाईक परीक्षा कक्षाच्या वतीने १२ अभ्यासक्रमांसाठी आॅनलाईन परीक्षा घेण्यात येते. यामध्ये उच्च शिक्षण विभागाच्या विधी पाच वर्ष, विधी तीन वर्ष, बी.एड., एम.एड., बी.पी.एड., बी.ए.बी.एड / बी.एस्सी.बी.एड (एकात्मीक),बी.एड / एम.एड (एकात्मिक) तसेच तंत्र शिक्षण विभागाच्या एम.एच.एम.सी.टी, बी.एच.एम.सी.टी, एम.आर्च, एम.सी.ए आदींचा समावेश आहे. या परींक्षासाठी आॅनलाईन अर्ज भरण्याची मुदत संपली होती. परंतु, अनेक विद्यार्थी फी भरल्यानंतर आॅनलाईन अर्जाची प्रक्रीया पूर्ण करू शकले नव्हते. तसेच काही विद्यार्थी आॅनलाईन नोंदणीही करू शकले नाही.
कोरोना संसर्गामुळे अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसेच लॉकडाउनचा फटकाही विद्यार्थ्यांना बसला आहे. त्यामुळे, जे विद्यार्थी अर्ज भरण्यापासून वंचित राहीले असतील त्यांच्यासाठी शासनाने विशेष बाब म्हणून दोन दिवस अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या दोन दिवसात विद्यार्थ्यांना आॅनलाईन अर्ज व परीक्षा क्षुल्क भरण्याची प्रक्रीया पूर्ण करावी लागणार आहे,असे ४ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या पत्रकात राज्य सामाईक परीक्षा कक्षाने स्पष्ट केले आहे.


विद्यार्थ्यांना शेवटची संधी
सर्व विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी असून ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज भरले असतील त्यांना बदल करता येणार नाही. तसेच परीक्षा केंद्र बदलण्याची सुविधा मिळणार नाही.यापूर्वी अर्ज केलेले विद्यार्थी दुसºया अभ्यासक्रमासाठी नव्याने अर्ज करू शकतात.परंतु, त्यांना आधी भरलेले परीक्षा क्षुल्क परत मिळणार नाही.एकदार सादर केलेल्या अर्जात बदल करता येणार नसल्याचे राज्य सामाईक परीक्षा कक्षाने स्पष्ट केले आहे.

 

Web Title: Extension in filling up the application for CET Online Entrance Exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.