विस्तार अधिकाऱ्यास लाच स्वीकारताना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 11:05 AM2020-06-24T11:05:26+5:302020-06-24T11:05:38+5:30

नांदुरा पंचायत समितीमधील विस्तार अधिकारी सदाशीव सावजी सपकाळ (५६, रा. बन्सीलाल नगर, मलकापूर) यास रंगेहात पकडले आहे.

Extension officer arrested while accepting bribe | विस्तार अधिकाऱ्यास लाच स्वीकारताना अटक

विस्तार अधिकाऱ्यास लाच स्वीकारताना अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: ग्रामपंचायतीच्या मासिक सभा, ग्राम सभा तथा शिल्लकेचा तपशील सादर नाही केला म्हणून कर्तव्यात कसूर केल्याचा अहवाल वरिष्ठांना न पाठविण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने नांदुरा पंचायत समितीमधील विस्तार अधिकारी सदाशीव सावजी सपकाळ (५६, रा. बन्सीलाल नगर, मलकापूर) यास रंगेहात पकडले आहे. २३ जून रोजी दुपारी ही कारवाई बुलडाणा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.
दरम्यान, संबंधितांकडून रकमेची पाच हजार रुपये रक्कमही जप्त करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील शेलसूर येथील एका नोकरी करणाºया व्यक्तीस ही मागणी विस्तार अधिकारी (वर्ग तीन) सदाशिव सपकाळ यांनी केली होती. प्रकरणी संबंधीत व्यक्तीने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुषंगाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता पंचा समक्ष विस्तार अधिकारी सदाशीव सपकाळ यांनी पाच हजार रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुषंगाने प्रत्यक्ष सापळा रचण्यात आला असता नांदुरा बसस्थानकावर पाच हजार रुपये स्वीकारतांना सदाशीव सपकाळ यांना रंगेहात पकडण्यात आले. दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अपअधीक्षक आर. एन. मळघणे, पोलिस नायक विलास साखरे, मोहम्मद रिजवान, पोलिस कॉन्स्टेबल विजय मेहेत्रे, जगदीश पवार, चालक मधुकर रगड व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

Web Title: Extension officer arrested while accepting bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.