ई पीक पेरा नाेंदणीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:41 AM2021-09-14T04:41:04+5:302021-09-14T04:41:04+5:30
बुलडाणा : शेतकऱ्यांना पीक पेरा सातबाऱ्यावर नाेंदविण्यासाठी शासनाने ॲप विकसित केले आहे़ या ॲपवर पीक पेऱ्याची नाेंद करण्याची मुदत ...
बुलडाणा : शेतकऱ्यांना पीक पेरा सातबाऱ्यावर नाेंदविण्यासाठी शासनाने ॲप विकसित केले आहे़ या ॲपवर पीक पेऱ्याची नाेंद करण्याची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत हाेती़ अनेक शेतकऱ्यांना पीक पेऱ्याची नाेंद करताना अडचणी येत असल्याने १५ दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे़ येत्या ३० सप्टेंबरपर्यंत शेतकरी आपल्या पिकाची नाेंदणी करू शकणार आहे़ तसेच तलाठी १५ ऑक्टाेबरपर्यंत पिकाची सातबाऱ्यावर नाेंद करणार आहेत, अशी माहिती बुलडाणा जिल्हा नाेडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अभिजित नाईक यांनी १३ सप्टेंबरला दिली.
पीक पेऱ्याची सातबाऱ्यावर नाेंद करण्यासाठी शासनाने ॲप विकसत केले आहे़ या ॲपवर नाेंदणी करताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत़ कृषी विभाग आणि महसूल विभागाच्या वतीने पीक नाेंदणीसाठी मार्गदर्शन करण्यात येत असले तरी प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत त्यांना पाेहोचणे शक्य नाही़ नेटवर्क आणि इतर समस्यांमुळे अनेक शेतकऱ्यांना पिकाची ई नाेंदणी करणे कठीण झाले आहे़ त्यातच काही दिवसांवर नाेंदणीची मुदत आल्याने अनेक शेतकरी पीक नाेंदणीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली हाेती़ त्यामुळे, शासनाने ॲपवर पीक नाेंदणी करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत वाढ दिल्याची माहिती बुलडाणा जिल्हा नाेडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अभिजित नाईक यांनी दिली़