जादा बसफेऱ्यांमधून खामगाव आगाराला २७ लाखाचे उत्पन्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 03:46 PM2019-11-01T15:46:26+5:302019-11-01T15:46:34+5:30
३० आॅक्टोबर पर्यंत खामगाव आगाराला २७ लाख ४२ हजार ५९६ रूपयांचे उत्पन्न झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: खामगाव आगाराकडून दिवाळीनिमित्त जादा बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले. या माध्यमातून ३० आॅक्टोंबर पर्यंत आगाराला २७ लाख ४२ हजार ५९६ रूपयांचे उत्पन्न झाले.
दिवाळी निमित्त खामगाव आगाराकडून अतिरिक्त एसटी बस फेºया सोडण्यात आल्या. २५ आॅक्टोंबरपासून खामगाव आगाराकडून अतिरिक्त बस फेºया सोडण्यात येत आहेत. आणखी चार दिवस म्हणजेच ५ नोव्हेंबर पर्यंत अतिरिक्त बस फेºया सुरू राहणार आहेत. दरम्यान खामगाव आगाराला याचा फायदाच झाला असून उत्पन्नात वाढ झाली आहे. ऐन दिवाळीमध्ये चार दिवस खामगाव आगाराकडून पुणे ते खामगावसाठी दररोज ५ गाड्या सोडण्यात आल्या. अकोला, औरंगाबादसाठी दररोज ३ जादा बसेस सोडण्यात असून सध्याही ह्या फेºया सुरू आहेत. तसेच औरंगाबादसाठी मुक्कामी ६ फेºया सुरू आहेत. खामगाव आगाराकडून दररोज ४ ते साडेचार हजार किलोमीटर प्रवासाचे अतिरिक्त नियोजन करण्यात आले आहे. सध्या प्रवाशांची गर्दी कमी झाली असली, तरी ५ नोव्हेंबर पर्यंत अतिरिक्त बसफेºया सुरूच राहणार असल्याची माहिती वाहतूक अधिक्षक रामकृष्ण पवार यांनी दिली. दरम्यान बुधवार ३० आॅक्टोबर पर्यंत खामगाव आगाराला २७ लाख ४२ हजार ५९६ रूपयांचे उत्पन्न झाले असून येत्या ५ नोव्हेंबर पर्यंत यात आणखी वाढ होणार आहे. (प्रतिनिधी)