शेतकऱ्यांच्या हद्दीतून नियमबाह्य उत्खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 01:58 PM2017-07-19T13:58:21+5:302017-07-19T13:58:21+5:30
शेतकऱ्याच्या हद्दीमधून कोणतीही विचारपूस न करता नियमबाह्य उत्खनन करण्यातआले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : मेहकर तालुक्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत अनेक गावात कामे सुरु
आहेत. परंतु सदर कामे करताना गावातील कोणालाही विश्वासात न घेता
नियमबाह्य पद्धतीने कामे सुरु आहेत. दरम्यान लोणी गवळी येथील एका
शेतकऱ्याच्या हद्दीमधून कोणतीही विचारपूस न करता नियमबाह्य उत्खनन करण्यात
आले असून, शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे
ग्रामसेवक व संबंधितांवर रितसर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार नरसिंग
पाटील यांनी केली आहे.
नरसिंग भास्करराव पाटील रा.लोणी गवळी यांच्या लोणीगवळी भाग १, गट नं.७८७
मध्ये नाला आहे. दरम्यान नरसिंग पाटील यांना विश्वासात न घेता व कोणत्याच
प्रकारची परवानगी न घेता ग्रामसेवक व संबंधितांनी जेसीबीद्वारे उत्खनन
करुन मरोहयो अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी माती व मुरुम वापरला आहे. नाला
उपसतांना संबंधीत शेतकऱ्याची कोणतीही परवानगी घेतली नाही. त्यामुळे माझे
मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी या प्रकरणाची चौकशी करुन ग्रामसेवक
व संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा पं.स.समोर आमरण उपोषण
करण्याचा इशारा नरसिंग पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. (तालुका
प्रतिनिधी)