पाण्याअभावी पानमळे नामशेष
By admin | Published: April 12, 2016 01:27 AM2016-04-12T01:27:59+5:302016-04-12T01:27:59+5:30
संग्रामपूर तालुक्यातील चित्र, पानमळ्यांचा व्यवसाय धोक्यात.
Next
संग्रामपूर (जि. बुलडाणा): संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल, उमरा, एकलारा, वानखेड ही गावे पान तांड्यासाठी (पानमळ्यासाठी) प्रसिध्द होती. मात्र गेल्या दहा वर्षापासून अल्प प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे व यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे पानमळे नामशेष होत आहेत. अल्प पावसामुळे विहिरींची व बोअरवेलची पाणी पातळी खालावली आहे. सद्यस्थितीत दोनशे फुटापर्यंतही पाणी लागत नाही. पानमळ्य़ासाठी पाणी जास्त लागत असल्याने ते जगविने शेतकर्यांसाठी अवघड झाले आहे. पानमळ्यांचा व्यवसाय धोक्यात आल्यामुळे पान उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.