अतिवृष्टी झाली तर ८६ गावांचा पुराचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:34 AM2021-07-29T04:34:25+5:302021-07-29T04:34:25+5:30
बुलडाणा जिल्ह्यातून एकूण १४ नद्या वाहतात. त्यापैकी पूर्णा, पैनगंगा या मोठ्या नद्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यात ३ मोठे, ७ मध्यम ...
बुलडाणा जिल्ह्यातून एकूण १४ नद्या वाहतात. त्यापैकी पूर्णा, पैनगंगा या मोठ्या नद्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यात ३ मोठे, ७ मध्यम व ८१ लघू प्रकल्प आहेत. जिल्ह्यात प्रामुख्याने पाच तालुक्यांतील गावे ही पुरामुळे बाधित होतात. या मधील २८७ गावे ही संभाव्य पुरग्रस्त गावे म्हणून अेाळखल्या जातात. त्यापैकी ८६ गावे हे अतिप्रवण क्षेत्रामध्ये मोडतात. प्रामुख्याने पूर्णा नदीकाठच्या गावांचा यात समावेश आहे. मात्र जिगाव प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होईल.
--पोलिसांच्या सेवा अधिग्रहित--
संभाव्य आपत्कालीन परिस्थितीसाठी दहा पोलिस कर्मचाऱ्यांची सेवा अधिग्रहित करण्यात आली आहे. सोबतच पोलिसांची एक व्हॅनही त्यासाठी उपलब्ध करण्यात आलेली आहे.
--यंत्रणेने केली रंगीत तालीम--
प्रसंगी अतिवृष्टी झाल्यास कमीत कमी वेळेत मदत पोहोचविण्याच्या दृष्टीने चार दिवसांपूर्वीच महसूल यंत्रणेने आनुषंगिक रंगीत तालीम केली आहे. सोबतच आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे बोट, पट्टीचे पोहणारे, तथा आपत्कालीन स्थितीत कोणत्या ठिकाणी नागरिकांची व्यवस्था केली जावी याचा संपूर्ण आराखडा तयार करण्यात आलेला आहे.