जागेचा वाद आपसात मिटविण्यावरून हाणामारी
By admin | Published: June 13, 2017 12:15 AM2017-06-13T00:15:34+5:302017-06-13T00:15:34+5:30
धाड : घराच्या जागेचा वाद आपसात मिटवून घेण्याच्या कारणावरुन दोन गटात हाणामारी झाल्याची घटना सोमवारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांवर गुन्हे दाखल केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
धाड : घराच्या जागेचा वाद आपसात मिटवून घेण्याच्या कारणावरुन दोन गटात हाणामारी झाल्याची घटना सोमवारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांवर गुन्हे दाखल केले आहे.
या प्रकरणी परस्परविरोधी तक्रार महिलांनी दिली. तक्रारीनुसार घराच्या जागेच्या वादाचे तडजोड आपसात करण्यास सांगितल्याने मारहाण करण्यात आली. यावरुन पोलिसांनी एकाच समाजाच्या दोन्ही गटातील लोकांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली. दुधा येथील एकाच समाजातील नातलग असणाऱ्या दोन कुटुंबातील महिलांनी आपल्या तक्रारीत नमूद केले, की त्यांचा गावातील जागेवरुन जुना वाद होता. तो वाद आपसात मिटवण्यासाठी आरोपी राजेंद्र प्रभाकर शेलार, प्रभाकर हरी शेलार, सुरेखा राजेंद्र शेलार व विमल प्रभाकर शेलार हे फिर्यादीस डोंगरात शेळ्या चारताना भेटले व वाद आपसात मिटवून घेण्यास सांगत शिवीगाळ करुन काठीने मारहाण केली.
या तक्रारीवरून आरोपींवर कलम ३५४, ३२४, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा नोंद केला. तसेच सुरेखा राजेंद्र शेलार ह्या महिलेने पोलिसात तक्रार दिली की, प्रमोद उत्तम शेलार, समाधान उत्तम शेलार, उत्तम हरी शेलार व कमल उत्तम शेलार हे घरी आले व जागेचा जुना वाद मिटवून असे म्हणत शिवीगाळ करुन काठीने मारहाण करत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. यावरून पोलिसांनी आरोपींवर कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादंवि गुन्हा नोंद केला. पुढील तपास ठाणेदार संग्राम पाटील व ना.पो.का. प्रकाश दराडे, दशरथ शितोळे करत आहे.