पोलीस भरतीत अपयशी झाला; मद्य पिऊन पोलीस ठाण्यात गोंधळ घातला

By अनिल गवई | Published: January 14, 2023 02:27 PM2023-01-14T14:27:56+5:302023-01-14T14:28:31+5:30

शेगाव तालुक्यातील एका युवकाने पोलीस भरतीसाठी पात्रता परिक्षा दिली. या परिक्षेत त्याला अपयश आले.

Failed to recruit police; After drinking alcohol, he created a ruckus in the police station | पोलीस भरतीत अपयशी झाला; मद्य पिऊन पोलीस ठाण्यात गोंधळ घातला

पोलीस भरतीत अपयशी झाला; मद्य पिऊन पोलीस ठाण्यात गोंधळ घातला

googlenewsNext

खामगाव : पोलीस भरती अपयशी ठरलेल्या एका युवकाने शुक्रवारी रात्री ९ वाजता दरम्यान, खामगाव येथील शहर पोलीस स्टेशनमध्ये चांगलाच गदारोळ केला. अश्लिल शिवीगाळ करीत शहर पोलिस निरिक्षकांच्या केबीनच्या बाजूला असलेल्या महिला पोलीस कक्षाच्या दरवाजाला लाथा मारत आरडाओरड करून धुमाकुळ घातला. मद्यधुंद असलेला हा युवक कुणाचेही काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. पोलीसांना अश्लिल भाषेत शिविगाळ करीत असल्याने पोलिसांनी त्याला बाजीरावचा हिसका दाखविला. त्यानंतर त्याचे नातेवाईक त्याला पोलीस स्टेशनमधून घेऊन गेले.

शेगाव तालुक्यातील एका युवकाने पोलीस भरतीसाठी पात्रता परिक्षा दिली. या परिक्षेत त्याला अपयश आले. त्यामुळे हिरमोड झालेल्या युवकाने खामगाव शहर गाठले. काही सहकाºयांनी त्याला दारू पाजली. प्रचंड दारू ढोसल्यानंतर नियंत्रण हरविलेल्या युवकाने सुरूवातील पोलीस वसाहतीत धूम ठोकली. त्यानंतर वसाहतीच्या बाजूने असलेल्या गेट मधून शहर पोलिस स्टेशन गाठले. आवारातील पार्किंग आणि मूत्रीघराजवळ बसून बराचवेळ गोंधळ घातला. युवकाकडील बॅगमधील कागदपत्रांच्या आधारे उपस्थित पोलीसांनी त्याची ओळख पटविली. त्याच्या नातेवाईकांसह माहिती देण्यात आली. गावातील काही युवक पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. त्याला समजावू लागले. पण कुणालाही काहीही न जुमानता त्याने शहर पोलीस निरिक्षकांच्या केबिनकडे धाव घेतली. महिला पोलीस कक्षाच्या दरवाजाला लाता मारत पोलीसांना अश्लिल शिविगाळ सुरू केली. त्यावेळी उपस्थित पोलीसांनी त्याच्यावर नियंत्रण मिळवित पोलीसी खाक्या दाखविल्या. बाजीरावचा प्रसाद दिल्यानंतर नातेवाईकांच्या स्वाधीन केले. दरम्यान, शनिवारी सकाळी या युवका विरोधात शहर पोलिसांनी कलम ११०, ११७ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई केली.

डीबी प्रमुखांची संयमी भूमिका!

-मद्यधुंद अवस्थेत धुमाकुळ घालणाºया युवकाला डीबी प्रमुखांनी संयमी भूमिका घेत समजाविण्याचा प्रयत्न केला. पोलीस भरतीत हिरमोड झाल्यानंतर संतुलन गमविलेल्या या युवकाला डीबी प्रमुखांसह उपस्थितांनी पोलीस स्टेशनच्या आवाराबाहेर जाण्याच्या सर्वसंधी दिल्या. काहींनी त्याच्या गाव, परिसरातील राजकीय नेत्यांशीही संपर्क साधला. मात्र, तो काही केल्या बधत नव्हता.

वाघनखे रूतताच ‘दत्ता’भानावर!

गावातील युवक आणि उपस्थित पोलीस समजावित असतानाच चेकाळलेला युवक आणखी सैराट होत होता. पोलीसांना शिविगाळ करीत होता. अशातच त्याने शहर पोलिस निरिक्षकांच्या महिला कक्षाला लाता मारत अश्लिल शिविगाळ केली. त्यावेळी निरिक्षकांच्या बाजूच्या केबीनमधील काही पोलीसांच्या अंगात ‘वाघ’संचारला. एकाने आपली नखे रूतविली. तर काहींनी बंद खोलीत बाजीरावचा हिसका दाखविला. त्याच्या अंगावर पाणी ओतले. तेव्हा कुठे ‘दत्ता’शुध्दीवर आला.

मोटारसायकल स्वार जखमी

- बेधुंद युवकाने सुरूवातीला अग्रेसन चौकातून पोलीसस्टेशनकडे धूम ठोकली. वाटेत नाल्यावरील पुलावर एका दुचाकी स्वाराच्या अंगावर धावला. यावेळी दुचाकी स्वाराचे नियंत्रण सुटल्याने तो नाल्यात कोसळता -कोसळता कसाबसा बचावला. यात शिवा नामक दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला.
 

Web Title: Failed to recruit police; After drinking alcohol, he created a ruckus in the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.