प्रसिद्धीचा हव्यास सानंदांनाच!

By admin | Published: July 15, 2017 12:39 AM2017-07-15T00:39:51+5:302017-07-15T00:39:51+5:30

भाजप शहराध्यक्ष संजय शिनगारे यांचा पलटवार

The fame of publicity! | प्रसिद्धीचा हव्यास सानंदांनाच!

प्रसिद्धीचा हव्यास सानंदांनाच!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: गल्ली ते दिल्ली सत्तेतून बेदखल होऊनसुद्धा माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांची फुकटचे श्रेय लाटण्याची जुनी सवय अद्यापही गेलेली नाही. विधान सभा, नगरपालिका व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये खामगाव विधान सभा मतदारसंघातील सुज्ञ जनतेने काँग्रेस पक्षाला व सानंदांना सपशेल घरी बसविले. मात्र, पराभवाचे आत्मचिंतन करण्याऐवजी दिशाभूल करण्यातच ते धन्यता मानत असल्याचा पलटवार भाजप शहर अध्यक्ष संजय शिनगारे यांनी केला आहे.
ना. भाऊसाहेब फुंडकर व आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी फुकटचेच काय, तर स्वत: केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामांचे श्रेयाचे राजकारण कधीही केले नसून, सानंदांनी वर्तमानपत्रांना प्रसिद्धी पत्रक पाठवून नामदार भाऊसाहेब फुंडकर व आ.अ‍ॅड. आकाश फुंडकर यांच्यावर केलेले आरोप धादांत खोटे, तथ्यहीन व जनतेची दिशाभूल करणारे आहेत. सामान्य रुग्णालयातील ज्या काँग्रेस शासनाच्या काळातील कामांचा उल्लेख सानंदांनी केला, तेव्हा फक्त ती कामे प्रस्तावित झालेली होती; परंतु सानंदांनी डायलिसीससाठी अंदाजपत्रकातील संपूर्ण कामे मंजूर होण्यासाठी एक कोटी रुपयांची आवश्यकता असताना केवळ ३३ लाख रुपये एवढाच निधी मिळाल्याने भिंती व स्लॅब टाकणे एवढेच काम झाले. तर उर्वरित निधी खेचून आणण्याकरिता कोणतेही प्रयत्न केले नाही.
आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर हे निवडून आल्यानंतर त्यांनी सामान्य रुग्णालय येथे घेतलेल्या आढावा बैठकीत डायलिसीस युनिटचे काम निधीअभावी रखडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर आमदार फुंडकरांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व रुग्णालय प्रशासनाला सूचना देऊन डायलिसीस युनिटच्या उर्वरित कामाच्या निधीसाठी सुधारित प्रस्ताव शासनास सादर करण्यास सांगितले. त्यानंतर त्याचा पाठपुरावा करीत २० मे २०१७ रोजी आयुक्त आरोग्य सेवा संचालनालयाद्वारे त्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. तसेच सोनोग्राफी मशीन्स सुरू करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करून घेतली. कालपर्यंत जवळपास ४३७० रुग्णांनी सोनोग्राफीचा लाभ घेतला आहे. आ. आकाश फुंडकर यांच्या प्रयत्नांनी पाच नवीन व्हेंटीलेटर बसविण्यात आले. एन.आर.एच.एम. च्या माध्यमातून भुल तज्ज्ञ व शल्यचिकित्सक ही रिक्त पदे मान्यता मिळवून प्राप्त करून घेतली असून, या पदांवर लवकरच संबंधित डॉक्टर रुजू होणार आहेत. शवविच्छेदन गृह, रुग्णाच्या नातेवाईकांसाठी निवारा बांधकाम, अंतर्गत रस्ते डांबरीकरण, अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता निवासस्थाने बांधकाम करणे, यासह कोट्यवधी रुपयांची विविध कामे शासनदरबारी प्रस्तावित असून, लवकरच त्याला मान्यता मिळून कामे सुरू होणार आहेत, असेही संजय शिनगारे यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

‘सामान्य रुग्णालया’चा दर्जा भाऊसाहेबांमुळेच!
खामगाव परिसरात झालेली धरणे असो किंवा एमआयडीसी भाऊसाहेबांच्या काळातीलच. एवढेच काय, तर रुग्णालयाला मिळालेला ‘साामान्य रुग्णालय’हा दर्जादेखील भाऊसाहेब जेव्हा पहिल्यांदा १९७८ मध्ये आमदार झाले, तेव्हा त्यांच्या पाठपुराव्यामुळेच मिळालेला आहे. त्यामुळेच खामगावच्या सामान्य रुग्णालयात रुग्णसेवेचा दर्जा सुधारला आहे व त्याचा फायदा जनतेला आजही होत आहे, हे सानंदा विसरलेले दिसतात, हे उल्लेखनीय.

Web Title: The fame of publicity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.