कौटुंबिक वादातून जावयावर काठीने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:05 AM2017-10-25T00:05:10+5:302017-10-25T00:18:33+5:30

देळगावराजा : कौटुंबिक वादातून सासरच्या मंडळीने जावयावर काठीने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी गिरोली बु. येथे घडली. जावई राजू किसन शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

family dispute with daughter's husbund | कौटुंबिक वादातून जावयावर काठीने हल्ला

कौटुंबिक वादातून जावयावर काठीने हल्ला

Next
ठळक मुद्देगिरोली बु. येथील घटनाचार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
देळगावराजा : कौटुंबिक वादातून सासरच्या मंडळीने जावयावर काठीने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी गिरोली बु. येथे घडली. जावई राजू किसन शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
गिरोली बु. येथील राजू किसन शिंदे याला दोन मुले असून, काही दिवसांपूर्वी पत्नी मोठय़ा मुलासह माहेरी शिंदी पो.स्टे.साखरखेर्डा येथे निघून गेली होती. २४ ऑक्टोबरला शिंदी येथून सासरची मंडळी गिरोली येथे आली. पत्नीला नांदवत नाही, म्हणून राजू शिंदेसोबत त्यांचा वाद झाला, नंतर सासरची मंडळी देऊळगावराजा येथे येऊन परत गिरोला गेली. यामध्ये अविनाश किसन मंजुळकर, निरंजन किसन मंजुळकर, किसन बाबूराव मंजुळकर, एकनाथ चिमाजी लष्कर व राजू शिंदेची पत्नी, सासू व साली यांचा समावेश होता. फिर्यादीवरून शिंदे याला सासरच्या मंडळीने तुझ्या पत्नीला तू नांदवत का नाहीस म्हणून विचारले असता, माझी पत्नी काहीही न सांगता माहेरी निघून जाते, असे म्हणताच आरोपींनी शिवीगाळ सुरू केली. अविनाश किसन मंजुळकर याने काठीने मारहाण केली. निरंजन मंजुळकर, किसन मंजुळकर, एकनाथ लष्कर यांनी शिवीगाळ करून खाली पाडून चापटा बुक्क्यांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी देऊन आलेल्या अँपे वाहनातून पळून गेले. माझ्या जीवाला धोका निर्माण झाल्याची फिर्याद राजू शिंदे याने दिल्याने व वैद्यकीय अहवालावरुन पोलिसांनी अविनाश किसन मंजुळकर, किसन बाबूराव मंजुळकर, एकनाथ चिमाजी लष्कर या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास बिट जमादार विश्‍वनाथ राठोड करीत आहेत. 

Web Title: family dispute with daughter's husbund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा