घर रिकामे करण्यावरुन कुटुंबीयास मारहाण; पिता-पुत्राविरुध्द गुन्हा दाखल
By admin | Published: May 24, 2017 07:23 PM2017-05-24T19:23:06+5:302017-05-24T19:23:06+5:30
खामगाव : ज्या घरात राहता ते घर आमचे असून खाली करा, या कारणावरुन शिविगाळ करुन कुटुंबीयास लोखंडी सळईने मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पिता-पुत्राविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : ज्या घरात राहता ते घर आमचे असून खाली करा, या कारणावरुन शिविगाळ करुन कुटुंबीयास लोखंडी सळईने मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पिता-पुत्राविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शेगाव येथील डगडाळीपुरा भागात मंगळवारी सकाळी घडली. याप्रकरणी सायराबानो नुरखॉ (वय ५०) रा.डगडाळीपुरा या महिलेने फिर्याद दिली की, शे.मुश्ताक शे.मतीन व त्याचे वडिल शे.वाहेद शे.मुश्ताक यांनी तुम्ही राहत असलेले घर आमचे असून लवकर खाली करा यावरुन वाद घालत शिविगाळ केली तसेच पती व मुलीस लोखंडी सळई व वीट मारुन जीवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरुन शेगाव शहर पोलिसांनी उपरोक्त पिता-पुत्राविरुध्द कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.