कुटुंबाचा वेळही जनसेवेसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:33 AM2021-05-15T04:33:34+5:302021-05-15T04:33:34+5:30
कुटुंबासाठी वेळच देता येत नाही बुलडाणा पाेलस अधीक्षक पदाची सूत्रे घेतल्यानंतर कामाचा ताण वाढलेला आहे़ माझे कुटुंब पुण्याला ...
कुटुंबासाठी वेळच देता येत नाही
बुलडाणा पाेलस अधीक्षक पदाची सूत्रे घेतल्यानंतर कामाचा ताण वाढलेला आहे़ माझे कुटुंब पुण्याला राहते़ पत्नी बालराेगतज्ज्ञ आहे़ दिवाळीला केवळ दाेन दिवसांसाठी पुण्याला जाता आले़ त्यानंतर कामाचा ताण वाढल्याने सहा महिन्यांपासून पुण्याला जाणेच झाले नाही़
बुलडाण्याचे पाेलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या पत्नी डाॅ़ सुरेखा चावरिया या पुण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे़ चावरिया यांनी बुलडाण्याच्या पाेलीस अधीक्षक पदाचा प्रभार घेतल्यानंतर जबाबदारी वाढली़ विविध गुन्ह्यांचा तपास व इतर प्रशासकीय कामे सांभाळत असतानाच मार्च महिन्यापासून काेराेनाची दुसरी लाट आली़ त्यामुळे आराेग्य विभागाबराेबरच पाेलीस विभागावरचाही ताण वाढला आहे़ एप्रिल महिन्यात प्रशासनाने विविध आदेश काढले़ त्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पाेलिसांवर साेपवली़ जिल्ह्याची जबाबदारी सांभाळताना कुटुंबासाठी वेळच देता येत नसल्याचे अरविंद चावरिया यांनी लाेकमतशी बाेलताना सांगितले़ डाॅ़ सुरेखा चावरिया यांच्यासह दाेन मुले पुण्यात राहतात़ एका मुलाचे पदवीपर्यंत शिक्षण झाले असून दुसरा मुलगा पदवीच्या अंतिम वर्षाला आहे़ वैद्यकीय क्षेत्रावर ताण वाढल्यामुळे डाॅ़ सुरेखा यांनाही सुट्या मिळत नसल्याने फाेनवरून कुटुंबांशी संवाद साधावा लागत आहे़