शेतीचा वाद; मुलानेच केली आईला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 12:59 AM2017-11-14T00:59:28+5:302017-11-14T00:59:47+5:30
अंढेरा पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या चिखली तालुक्यातील मिसाळवाडी येथील ७२ वर्षीय रुक्मिणाबाई मिसाळ या वृद्धेस तिचा मुलगा आणि सुनेने बेदम मारहाण केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंढेरा : अंढेरा पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या चिखली तालुक्यातील मिसाळवाडी येथील ७२ वर्षीय रुक्मिणाबाई मिसाळ या वृद्धेस तिचा मुलगा आणि सुनेने बेदम मारहाण केली.
वडिलोपाजिर्त शेती दहा एकर असताना रुक्मिणा मिसाळ या हलाखीचे जीवन जगत आहेत. त्यांना उदरनिर्वाहासाठी गट क्र.३१ मध्ये ३५ आर जमीन दिली आहे; पण या जमिनीचा वाद वारंवार होत असताना सोयाबीनची सुडी का काढता, अशी विचारणा करण्यास गेली असता, १0 नोव्हेंबर रोजी ११ वाजता शेतात स्वत:च्या आईला मुलगा भीमराव मिसाळ, रमेश मिसाळ, सरिता अशोक मिसाळ, बेबी मिसाळ, मालता मिसाळ यांनी त्यांना मारहाण केली. यावेळी सुरेश मिसाळ याने अंढेरा पोलीस स्टेशनला तक्रार देऊन फिर्याद नोंदविली व आईला पुढील उपचारासाठी जिल्हा ग्रामीण रुग्णालय बुलडाणा येथे दाखल केले.
संबंधित प्रकाराची तक्रार अंढेरा पोलीस स्टेशनला असतानासुद्धा तपास अधिकारी पोहेकाँ पोफळे यांच्या हलगर्जीमुळेच झाला असून, अशा आशयाची तक्रार त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक बुलडाणा येथे केली आहे. वरिष्ठांनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कायदेशीर कारवाई करून रूक्मिणाबाई मिसाळ यांना न्याय द्यावा, अशी मागणी आहे. या प्रकरणात पोलीस संबंधिताविरोधात कारवाई करण्याची प्रक्रिया करीत आहेत.