ज्ञानगंगा नदीपात्रात बुडून शेतमजुराचा मृत्यू; नारायणपूर शिवारातील घटना

By विवेक चांदुरकर | Published: July 26, 2023 03:13 PM2023-07-26T15:13:27+5:302023-07-26T15:15:33+5:30

याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Farm laborer dies after drowning in Dyan Ganga; Incident in Narayanpur Shivara | ज्ञानगंगा नदीपात्रात बुडून शेतमजुराचा मृत्यू; नारायणपूर शिवारातील घटना

ज्ञानगंगा नदीपात्रात बुडून शेतमजुराचा मृत्यू; नारायणपूर शिवारातील घटना

googlenewsNext

नांदुरा (बुलढाणा) : तालुक्यातील निमगाव गावाजवळ नारायणपूर येथील शेतमजूर अनंता नारायण काकर यांचा नदीपात्रातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना २६ जुलै रोजी उघडकीस आली.

तालुक्यातील नारायणपूर येथील शेतमजूर अनंता नारायण काकर २५ जुलै रोजी सकाळी शेतात मजुरी करण्याकरीता गेले होते. संध्याकाळ झाली तरी ते घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी व गावातील नागरिकांनी परिसरात त्यांचा शोध घेतला. मात्र २६ जुलै रोजी त्यांचा मृतदेह नारायणपूर शिवारातील ज्ञानगंगा नदी पात्रात दिसून आला. मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्ञानगंगाला पूर आला आहे. या पुरात अनंता काकर यांचा बुडाल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Farm laborer dies after drowning in Dyan Ganga; Incident in Narayanpur Shivara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.