फळ झाडाच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्याचे खडकपूर्णासमोर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 02:13 PM2017-12-01T14:13:19+5:302017-12-01T14:21:03+5:30
देऊळगावराजा : खडकपूर्णा प्रकल्प बाधीत जमिनीसह फळझाडाचा मोबदला दहा वर्षापासून रखडला असून अधिकाºयांनी प्रशासकीय स्तरावर प्रस्तावात फळझाडा ऐवजी कलमे दर्शविल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
देऊळगावराजा : खडकपूर्णा प्रकल्प बाधीत जमिनीसह फळझाडाचा मोबदला दहा वर्षापासून रखडला असून अधिकाºयांनी प्रशासकीय स्तरावर प्रस्तावात फळझाडा ऐवजी कलमे दर्शविल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान न्याय हक्कासाठी इसरुळ येथील वृद्ध शेतकºयानी ३० नोव्हेंबरला खडकपूर्णा प्रकल्प कार्यालयासमोर उपोषण सुरु केले. तालुक्यातील इसरुळ येथील शेतकरी शेख मैनु शेख दादु यांची इसरुळ शिवारातील गट नं.१२५ मध्ये २८ आर जमीन पूर्णत: पाण्यात गेली आहे. खडकपूर्णा प्रकल्प बाधीत ह्या शेकºयाच्या शेतजमीनीचा दहा वर्षापूर्वी पंचनामा झाला. त्यावेळी अधिकाºयांनी फळझाडा ऐवजी कलमे असा उल्लेख नोंदविला व वेळोवेळी फळझाडाचा मोबदला मिळेल, अशी दिशाभुल करुन स्वाक्षरी घेतल्या. मात्र शासकीय दप्तरी कलमांची नोंद असल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. म्हणून वृद्ध शेतकरी शेरु मैनु यांनी उपोषणाला सुरुवात केली. सदर प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी सदर प्रकरणाची चौकशी करुन माझ्या जमिनीसह फळझाडाचा योग्य मोबदला मिळवून द्यावा व दिशाभूल करुन माझ्यावर अन्याय करणाºया अधिकाºयांविरुद्ध कारवाई करावी, या मागणीसाठी संबंधीत वृद्ध शेतकºयाने उपोषण मांडले आहे. (तालुका प्रतिनिधी)