स्वत:चे सरण रचून शेतकऱ्याने केली आत्महत्या, सिंदखेड राजातील सावखेड तेजन येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 01:43 AM2018-07-30T01:43:08+5:302018-07-30T01:43:17+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील सावखेड तेजन येथील ३५ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने शेतातच स्वत:चे सरण रचून विष प्राशन करीत सरणावरच स्वत:स जाळून घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी उघडकीस आली.
सिंदखेड राजा : बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील सावखेड
तेजन येथील ३५ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने शेतातच स्वत:चे सरण रचून
विष प्राशन करीत सरणावरच स्वत:स जाळून घेत आत्महत्या केल्याची
खळबळजनक घटना रविवारी उघडकीस आली.
गजानन अर्जून जायभाये असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
त्याच्याकडे तीन एकर शेती असून कर्जबाजारीपणा व नापीकीमुळे त्याने
आत्महत्या केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ३५ वर्षीय गजानन अर्जून
जायभाये याच्यावर महाराष्ट्र बँकेचे ७० हजार रुपयांचे पीक कर्ज होते.
त्यातच कर्जमाफीच्या गोंधळामुळे पुन्हा त्याला कर्ज मिळू शकले नाही.
त्यामुळे उधार-उसनवार करून करून त्याने बी, बियाणे, खत घेऊन पेरणी केली
होती. त्यातच सततची नापिकी, पावसाची ओढ व कर्जबाजारीपणामुळे घरप्रपंच
चालवणे त्याला अवघड होऊन बसले होते. त्यामुळे तणावाखाली येऊन गजानन
अर्जून जायभाये याने आत्महत्या केल्याची माहिती ज्ञानदेव कारभारी जायभाये
यांनी पोलिस ठाण्यात दिली. यासंदर्भातील तक्रारीमध्ये त्यांनी म्हंटले
आहे की, २९ जुलै रोजी सकाळीच गजानन शेतात गेला होता. औषध फवारणी
करण्यासाठी विषारी किटकनाशक, पंपाचा स्प्रे करण्यासाठी रॉकेल त्याने नेले
होते. दरम्यान, फवारणी करण्याअगोदर शेतातील लाकडे गोळा करून त्याने सरण
रचले. सोबतच विषारी औषध प्राशन करून सरणावर स्वत:स जाळून घेऊन आत्महत्या
केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. मृत शेतकरी हा पत्नी व पाच वर्षाच्या
मुलासह राहत होता.
अशी आली उघडकीस घटना
सकाळी त्याचे वडील अर्जून जायभाये शेतात गेले असता त्यांनी हा
प्रकार पाहिला व घटेची घरी माहिती दिली. दरम्यान, घटनास्थळी विषारी
किटकनाशकाची बाटली, रॉकेलचा डबा आणि गजाननच्या अंगातील कपडे आढळून आले
आहेत. प्रकरणी सहाय्यक ठाणेदार संतोष नेमणार, पोलिस हेडकान्स्टेबल बालाजी
फलटनकर, राजू घोलप यांनी घटनास्थळी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद
केली आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक ठाणेदार संतोष नेमणार व त्यांचे
सहकारी करीत आहेत.
घटनास्थळीच आढळले कपडे
मृत गजानन जायभाये याचे घटनास्थळानजीकच कपडे आढळून आले आहेत. या
प्रकरणाचा प्राथमिक तपास सिंदखेड राजा पोलिस करीत असून मृतकाच्या
नातेवाईकाने प्रकरणात तक्रार दिली आहे.