शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच नाही- आदित्य ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 05:53 PM2018-11-19T17:53:17+5:302018-11-19T17:54:17+5:30
मेहकर : राज्यात सरकारने कर्जमाफी जाहीर केली होती. मात्र अद्यापपर्यंत शेतकºयांची कर्जमाफी झाली नाही. तरी आजही ‘अच्छे दिन आणेवाले है’ हे आपण एैकतो. शिवसेनेसाठी समाजकारण हेच महत्वाचे आहे. शिवसेनेने ज्या ज्या ठिकाणी राजकारण केले असेल त्या ठिकाणचे खासदार, आमदार यांनी लोकांच्या सेवेसाठीच राजकारण केले, असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते तथा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : राज्यात सरकारने कर्जमाफी जाहीर केली होती. मात्र अद्यापपर्यंत शेतकºयांची कर्जमाफी झाली नाही. तरी आजही ‘अच्छे दिन आणेवाले है’ हे आपण एैकतो. शिवसेनेसाठी समाजकारण हेच महत्वाचे आहे. शिवसेनेने ज्या ज्या ठिकाणी राजकारण केले असेल त्या ठिकाणचे खासदार, आमदार यांनी लोकांच्या सेवेसाठीच राजकारण केले, असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते तथा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.
स्थानिक स्वातंत्र्य मैदानावर सोमवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खा. प्रतापराव जाधव हे होते. प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, दत्ता पाटील, भास्करराव मोरे, शांताराम दाणे, आशिष रहाटे, माजी नगराध्यक्ष संजय जाधव आदी उपस्थित होते. आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झाला. शिवसेनेने २०१२ मध्ये मुंबई येथे ७५ गावांना पाणीटँकर, धान्य दिले. २०१३-१४ मध्ये मराठवाड्यात ४०० गावांना मदत केली. बिडमध्ये सर्व जातीधर्माच्या लोकांचे सामूहीक विवाह सोहळा आयोजित करून १११ जोडप्यांचे लग्न लावले. यापुर्वी मार्च ते एप्रिल या महिन्यात दुष्काळ असायचे; मात्र आता आॅक्टोबर पासूनच राज्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. शेतकºयांना ते म्हणाले की, आत्महत्याचा विचार कधी मनात आणू नका. मदतीची हाक मारायची असेल तर सेनेला हाक मारा ती तुमच्यासाठी धावून येईल. कधी रडायचं नाही, लढायचं. जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त लोकांना दिलेले मदतीचे त्यांनी कौतूक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवासेनेचे ऋषी जाधव यांनी केले. आ. डॉ. संजय रायमुलकर यांनीही यावेळी मतदार संघात शेतकºयांसाठी केलेले कार्याची माहिती दिली. यावेळी जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना संसार उपयोगी वस्तू आदित्य ठाकरे यांच्याहस्ते देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सेना शहरप्रमुख जयचंद बाठीया यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सेना तालुकाप्रमुख सुरेश वाळुकर, बळीराम मापारी, पांडुरंग सरकटे सह शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी परिश्रम घेतले. यावेळी आत्महत्या केलेल्या शेतकºयांना श्रध्दांजली अर्पण करून राष्टÑगिताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी राष्टÑवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांचे शिवसेनेत प्रवेश करण्यात आला.
(शहर प्रतिनिधी)
जिल्ह्यात ५५० आत्महत्याग्रस्त परिवाराला मदत -जाधव
विदर्भात ज्या शेतकºयांनी आत्महत्या केल्या त्या शेतकºयांना मदतीचा हात प्रत्यक्ष कोणी दिला नाही. शिवसेनाच त्यांचे अडीअडचणीत धावून गेली व आत्महत्याग्रस्त परिवाराला मदत केली. जिल्ह्यात ५५० आत्महत्याग्रस्त परिवाराला मदत करण्यात आली असून, शेतकºयांच्या कुटुंबासाठी शिवसैनिक सदैव तत्पर आहे, असे प्रतिपादन खा. प्रतापराव जाधव यांनी केले.