शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 11:10 PM2024-09-26T23:10:41+5:302024-09-26T23:12:46+5:30

Ravikant Tupkar : जोपर्यंत पीकविम्याचे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नाही, तोपर्यंत जिल्हा कृषी अधीक्षक कक्षात मुक्काम ठोकणार असल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला होता. 

Farmer leader Ravikant Tupkar arrested by Buldhana police | शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई

शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई

बुलढाणा : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. रविकांत तुपकर यांच्यावर पोलिसांनी कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. पिकविम्यासाठी रविकांत तुपकर यांचं बुलढाणा जिल्हा कृषी अधिक्षकांच्या दालनात आंदोलन सुरू होतं. हे आंदोलन सुरू असतानाच पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

शेतकऱ्यांच्या पिकविम्याच्या प्रश्नावरून रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत. गुरुवारी (दि.२६) गादी आणि उशी घेऊन रविकांत तुपकर बुलढाणा जिल्हा कृषी कार्यालयात दाखल झाले. जोपर्यंत पीकविम्याचे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नाही, तोपर्यंत जिल्हा कृषी अधीक्षक कक्षात मुक्काम ठोकणार असल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला होता. 

बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात रविकांत तुपकर यांनी मुक्काम आंदोलन सुरू केलं आणि जिल्हा कृषी अधिक्षकांना फैलावर घेतलं. मात्र, अखेर पोलिसांनी कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. यावेळी मला गोळ्या घातल्या तरी चालेल पण शेतकऱ्यांसाठी लढत राहणार, असे रविकांत तुपकर यांनी सांगितले.

याचबरोबर, सरकारच्या या हुकूमशाहीचा मी निषेध करतो. शेतकऱ्यांनी गावागावात आंदोलन सुरू करा, असं आवाहन देखिल रविकांत तुपकर यांनी केले. तर शेतकऱ्यांच्या हक्काचा पिकविमा मागणाऱ्या रविकांत तुपकरांवर गुन्हा दाखल करता मग शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल का करत नाही? असा सवाल अॅड. शर्वरी तुपकर यांनी केला आहे.
 

Web Title: Farmer leader Ravikant Tupkar arrested by Buldhana police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.