बँकांच्या अडवणुकीमुळे शेतकरी सावकारांच्या दारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 11:46 PM2017-09-11T23:46:23+5:302017-09-11T23:46:55+5:30
बुलडाणा: शेतकर्यांना पेरणीसाठी लागणारे बँकेकडून पीक कर्ज दिल्या जाते; मात्र अनेक बँका नियमांवर बोट ठेवत असल्याने शेतकर्यांना वेळेवर पीक कर्ज मिळत नाही. पीक कर्जासाठी बँकांच्या अडवणुकीमुळे शेतकर्यांना खासगी सावकारांच्या दारात जावे लागते.
लोकमत न्यूज नेटवर्क

खरीप हंगामाच्या काळात शेतकर्यांना पेरणीसाठी पैशांची अत्यंत गरज असते; मात्र अशा काळात बँकेकडून पीक कर्ज मिळाले नाही तर शेतकरी खासगी सावकारांच्या दारात जाता त. शासन प्रत्येक गरजू शेतकर्याला पीक कर्ज देते, मात्र बँकेचे अधिकारी नियमांवर बोट ठेवून अनेक शेतकर्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवतात. तसेच पीक कर्ज पुनर्गठन करण्यासाठी शेतकर्यांना तगादा लावला जातो. शेतकर्यांची संमती न घेता पीक कर्जाचे पुनर्गठन केले जाते. नवीन पीक कर्जासाठी शेतकर्यांना वेठीस धरल्या जाते, त्यामुळे अशा शेतकर्यांना खासगी सावकारांकडे जावे लागते. पेरणीची अडचण लक्षात घेऊन खासगी सावकार मनमानी दरावर शे तकर्यांना कर्ज देतात. नापिकीमुळे तसेच मालाला कमी भाव मिळत असल्याने शेतकरी बँकेचे कर्ज भरू शकत नाहीत. अशा थकीत कर्जदार शेतकर्यांना बँक पीक कर्ज देण्यास नकार देते. परिणामी शेतकर्यांना सावकारांचा सामना करावा लागतो.