शेतकरी करतोय वरुणराजाला विनवणी

By Admin | Published: June 24, 2017 01:51 PM2017-06-24T13:51:35+5:302017-06-24T14:45:49+5:30

गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी हतबल झाला असून पारंपरिक पद्धतीनं धोंडी मागून तो वरुणराजाची विनवणी करताना दिसत आहे.

Farmer is pleading for Varunaraja | शेतकरी करतोय वरुणराजाला विनवणी

शेतकरी करतोय वरुणराजाला विनवणी

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत/संतोष आगलावे
बुलडाणा, दि. 24 -  गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी हतबल झाला असून पारंपरिक पद्धतीनं धोंडी मागून तो वरुणराजाची विनवणी करताना दिसत आहे.
 
जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावल्याने शेतक-यांना आनंद झाला होता. पावसाचे आगमन होत असल्याचे पाहून शेतक-यांनी शेतमशागतीची पेरणी युद्धस्तरावर केली. तर काही शेतक-यांनी पेरणीसुद्धा उरकून घेतली. 
 
मात्र गत काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. पिकांना अंकुर फुटत असताना पाण्याची नितांत गरज असून पाऊस मात्र बेपत्ता झाला आहे. त्यामुळे पेरणी करणा-या शेतक-यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
 
शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत असून वरुणदेवतेची विनवणी करण्यासाठी पारंपारिक धोंडीचा सहारा घेत आहेत. बोरखेड येथील शेतक-यांच्या वतीने शनिवारी गावातून धोंडी धोंडी पाणी दे असे म्हणत गावातून फेरी काढण्यात आली. यावेळी गावक-यांनी धोंडी मागणा-या मुलांचे स्वागत करत त्यांच्याशी सहमती दर्शविली.
 

Web Title: Farmer is pleading for Varunaraja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.