शेतकरी वळला भाजीपाल्याकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:26 AM2021-05-29T04:26:03+5:302021-05-29T04:26:03+5:30

ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीमध्ये वाढ साखरखेर्डा : ग्रामीण भागात दारू अड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. खुलेआम अवैध दारू ...

The farmer turned to vegetables | शेतकरी वळला भाजीपाल्याकडे

शेतकरी वळला भाजीपाल्याकडे

googlenewsNext

ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीमध्ये वाढ

साखरखेर्डा : ग्रामीण भागात दारू अड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. खुलेआम अवैध दारू विक्री सुरू आहे. दारू विक्रीवर कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. यामुळे तरुण वर्गही व्यसनाच्या आहारी जात आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

विद्युत उपकेंद्राची अनेक कामे रखडली

सिंदखेड राजा : तालुक्यातील काही ठिकाणच्या विद्युत उपकेंद्राचे काम कासवगीने होत असल्याने वेळोवेळी वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. वीजपुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने विद्युत उपकेंद्राचे काम पूर्ण करण्याची गरज आहे.

तलाठी कार्यालयेच तलाठ्यांच्या प्रतीक्षेत

बुलडाणा : तालुक्यातील अनेक तलाठी कार्यालयेच तलाठ्यांच्या प्रतीक्षेत आहेत. पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या कागदपत्रांची आवश्यकता असते. तलाठी कार्यालयांमध्ये तलाठी दररोज येत नसल्याने शेतकऱ्यांची अनेक कामे खोळंबत आहेत. तालुक्यातील अनेक तलाठी कार्यालयांची दुरवस्था झाली आहे.

शासकीय कार्यालय परिसरात अस्वच्छता

देऊळगाव राजा : शासकीय कार्यालय परिसरातच अस्वच्छता वाढली आहे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, बँका यासह इतर शासकीय कार्यालयाच्या मागील परिसरातच मोठ्या प्रमाणात घाण साचत आहे. काही कार्यालय परिसरातच सांडपाण्याच्या नाल्याचा प्रश्न निर्माण होत आहे.

घरकूल लाभार्थ्यांची योजनांकडे पाठ

बुलडाणा : घरकूल बांधण्यासाठी तुटपुंजे अनुदान मिळत असल्याने काही लाभार्थ्यांनी योजनांकडे पाठ फिरवली आहे. ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत लाभार्थींना घरकूल देण्यात येते; परंतु महागाईच्या काळात घरकूल बांधण्यासाठी हे अनुदान कमी पडते.

पेरणीपूर्वी मार्गदर्शनाची गरज

हिवरा आश्रम : पिकावर वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी बीज प्रक्रियाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना तांत्रिकदृष्ट्या मार्गदर्शन झाल्यास उत्पादन वाढीस फायदा होऊ शकतो.

गावपातळीवर रुग्णवाहिका द्यावी

धामणगाव बढे : गावपातळीवर रुग्णवाहिका देण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. ग्रामस्तरावर रुग्णांना अनेकदा वाहन उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात आरोग्य विभागाने रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

वर्दळीच्या रस्त्यावरच लावली जातात वाहने

डोणगाव : येथून गेलेल्या नागपूर ते औरंगाबाद महामार्गावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. डोणगाव येथे वर्दळीच्या रस्त्यावरच वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. गावात नव्याने बांधलेल्या रस्त्यावर विविध इमारतींसमोर दुचाकी व चारचाकी वाहने उभी करण्यात येतात. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होते.

नाव नसल्याने पीक विम्यापासून वंचित

बुलडाणा : मागील वर्षीच्या पीक विम्याचा तिढा अद्याप सुटला नाही. पीक विमा यादीत नाव न आल्याने अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत. त्यामुळे शेतकरी पीक विम्यासाठी बँकेचे उंबरठे झिजवत आहेत. पीक विम्याचा लाभ देण्याची मागणी होत आहे.

पीक कर्ज देण्याची मागणी

मेहकर : तालुक्यात मागील वर्षी सोयाबीन उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. उत्पादनाचा खर्चही भरून निघाला नाही. अनेक शेतकऱ्यांना खरिपाचे कर्ज मिळाले नाही. त्यामुळे यंदा पीक कर्ज वेळेवर देण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

इमारतीविना ग्रामपंचायत कार्यालय

लोणार : ग्रामीण भागाचा सर्व कारभार ग्रामपंचायतीमार्फत चालतो; परंतु तालुक्यातील जवळपास अनेक ग्रामपंचायत कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नसल्याने ग्रामपंचायतीचा कारभार इतरत्र चालत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

पुलांना कठडे नसल्याने अपघाताची शक्यता

डाेणगाव : परिसरातील अनेक पुलांना कठडे नसल्याने अपघाताची शक्यता आहे. पुलांना कठडे बसविण्याविषयी संबंधित विभागाकडे निवेदन देऊनही त्याची दखलच घेण्यात आली नसल्याचे चित्र आहे.

Web Title: The farmer turned to vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.