शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही- खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 12:16 PM2019-07-19T12:16:18+5:302019-07-19T12:16:41+5:30

कुठलाही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही, अशा सूचना कृषी व फलोत्पादन, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिल्या.

 Farmer will not be deprived of crop loan - Sadabhau Khot | शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही- खोत

शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही- खोत

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : राष्ट्रीयकृत बँकांनी दिलेल्या उद्दिष्टानुसार पीक कर्ज वितरणाची टक्केवारी वाढवावी. कमी पीक कर्ज वाटप असलेल्या बँकांनी त्यांच्या संबंधित शाखेच्या गावांमध्ये पीक कर्ज मेळाव्यांचे आयोजन सोमवारपासून करावे. कुठलाही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही, प्रधानमंत्री पीक विमा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व अन्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, अशा सूचना कृषी व फलोत्पादन, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात गुरूवारी संबंधित विभागांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जि. प. अध्यक्षा उमाताई शिवचंद्र तायडे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक उपस्थित होते. पीक कर्ज वितरणाची गती वाढविण्याच्या सूचना करीत कृषी राज्यमंत्री खोत म्हणाले, बँकांनी कर्जदार शेतकऱ्यांचा पीक विमा काढल्यानंतर त्याला पीक विमा काढल्याची पावती किंवा पुरावा द्यावा. विमा कंपनीने तालुका स्तरावर समन्वयक प्रतिनिधी नियुक्त करून पिक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करावी. तसेच पिक कापणी प्रयोगाचे तांत्रिक प्रशिक्षण आपल्या कर्मचाºयांना द्यावे. पिक कापणी प्रयोगानंतर तालुका कृषी अधिकारी, विमा कंपनी प्रतिनिधी यांनी जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेवून नंतरच पीक कापणी प्रयोगाचा अहवाल अंतिम करावा. शेती शाळांमध्ये पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधीने येवून शेतकºयांना मार्गदर्शन करावे.
बोगस बियाणे, किटकनाशके यांमुळे शेतकºयांचे नुकसान झाल्यास कारवाई करून संबंधित कृषि केंद्राचा परवाना निलंबित करावा. तसेच शेतकºयांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची कारवाई करावी. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतंर्गत पाच एकराआतील व पाच एकरवरील शेतकरी, संयुक्त खातेदार शेतकरी यांनाही लाभ मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र शेतकºयांची माहिती तातडीने केंद्र शासनाच्या पोर्टलवर अपलोड करावी, असेही ते म्हणाले.
याप्रसंगी कृषि विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, सहकार विभागाचे अधिकारी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, पणन विभागाचे अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी, भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणांचे अधिकारी, तहसिलदार आदींसह कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

पेयजलची कामे मुदतीत पूर्ण करण्याच्या सुचना
जिल्ह्यात राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमात ६६ कामांचा समावेश असून सर्व कामे प्रगतीपथावर आहेत. ही सर्व कामे विहीत मुदतीत पुर्ण करावी. कामे दर्जेदार होतील याकडे लक्ष द्यावे. पाणीपुरवठ्यासाठी पावसाचे प्रमाण बघून टँकरची मागणी येवू शकते. मागणी आल्यास त्वरित टँकर सुरू करावे. सध्या सुरू असलेल्या गावांमधील आरओ मशीनची नियमित देखभाल दुरूस्ती करावी, अशा सुचना सदाभाऊ खोत यांनी यावेळी दिल्या.

Web Title:  Farmer will not be deprived of crop loan - Sadabhau Khot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.