शेतकर्यांची दिवाळी अंधारात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 01:06 AM2017-10-16T01:06:24+5:302017-10-16T01:07:24+5:30
खामगाव: मूग, उडीद, सोयाबीन, कापूस आदी शेतमालास हमीभावापेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गास आ िर्थक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: मूग, उडीद, सोयाबीन, कापूस आदी शेतमालास हमीभावापेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गास आ िर्थक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. खरीप हंगामात पेरणीवर केलेला खर्चही वसूल झालेला नसून, शंभराचे साठ झाल्याने शे तकरी निराश झाला आहे. त्यामुळे त्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे.
शासनाने शेतमालास हमीभाव जाहीर तर केला; पण आज रोजी बहुतांश शेतमालास हमीभावानुसार भाव दिला जात नसल्याचे वास्तव समोर आलेले आहे. नॉन एफएक्यूच्या नावाखाली शे तमालाची कमी भावाने खरेदी केली जात आहे. त्यामुळे शे तकर्यांची निराशा झालेली आहे. खरिपातील पिकांच्या उत् पादनावर केलेला खर्चसुद्धा निघाला नसून, शंभराचे साठ झाल्याने शेतकर्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे.
नॉन एफएक्यूच्या नावाखाली कमी भावाने खरेदी
शासनाच्या निकषात न बसणार्या निकृष्ट दर्जाच्या, ओल्या असलेल्या शेतमालास नॉनएफएक्यू प्रमाणपत्र देऊन त्याची खरेदी हमीभावापेक्षा कमी भावाने करण्याची मुभा शासनाने दिलेली आहे. परंतु व्यापारी वर्गाकडून दज्रेदार मालाससुद्धा नॉनएफएक्यू दाखवून कमी भावाने खरेदी केली जात आहे. यामध्ये संबंधित अधिकार्यांची मिलीभगत असण्याची शक्यता असून, या प्रकारामुळे शेतकरी मात्र पुरता नागवला जात आहे.