शेतकर्यांनो, देशव्यापी संपासाठी तयार राहा - रविकांत तुपकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:59 AM2018-02-15T00:59:52+5:302018-02-15T01:00:04+5:30
चिखली : भाजपा सरकारने शेतकर्यांना अक्षरश: वार्यावर सोडले असून, या घोषणाबाज सरकारच्या विरोधात शेतकर्यांना मोठी लढाई लढावी लागणार आहे. त्यासाठी लवकरच देशभरातील विविध संघटना एकत्न येऊन दिल्ली येथे शेतकर्यांचे मोठे आंदोलन उभे केल्या जात असून, या आंदोलनासाठी शेतकर्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क

तालुक्यातील सोनेवाडी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शाखेचे उद्घाटन रविकांत तुपकर यांच्या हस्ते झाले. यावेळी स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अमोल हिप्परगे उपस्थित होते.
यानिमित्त पार पडलेल्या सभेत शेतकरी व संघटनेच्या पदाधिकार्यांना मार्गदर्शन करताना रविकांत तुपकर यांनी शेतकर्यांच्या प्रश्नावर लवकरच देशव्यापी आंदोलन उभे करणार असल्याची माहिती देऊन भाजप सरकारने शेतकर्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही. सोयाबीनला भाव दिला नाही. बोंडअळीच्या अनुदानाची केवळ घोषणा केली. प्रत्यक्षात मात्न शेतकर्यांच्या खात्यात एक छदामही मिळाला नाही. आता पुन्हा गारपिटीने शेतकर्यांच्या हाता-तोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त झाले. त्यामुळे शेतकरी पार कोलमडून गेला असून, गारपीटग्रस्तांनासुद्धा हे सरकार वार्यावर सोडते की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.
केवळ घोषणा करून सरकार मोकळे होत आहे. त्यामुळे या घोषणाबाज सरकारच्या विरोधात शेतकर्यांना मोठी लढाई लढावी लागणार असल्याने आंदोलनासाठी शेतकर्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन केले. तसेच गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकर्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही तुपकर यांनी यावेळी केली. प्रसंगी अमोल हिप्परगे यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. यावेळी स्वाभिमानीचे राणा चंदन, बबनराव चेके, नितीन राजपूत, अनिल वाकोडे, राम अंभोरे, नीलेश राजपूत, शे.मुक्त्यार, भारत फोलाने, सुधाकर तायडे, रमेश सिरसाट, आत्माराम पाटील यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.