शेतकर्यांच्या दावणीला बैलांऐवजी ट्रॅक्टर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 12:17 AM2017-08-21T00:17:10+5:302017-08-21T00:19:38+5:30
बुलडाणा: जिल्ह्यात गाय, बैल व म्हैस अशी एकूण ६ लाख ९0 हजार जनावरे आहेत. आधुनिक शेतीची कास धरणार्या शे तकर्यांच्या दावणीलाही आता बैलांएवजी ट्रॅक्टर दिसत असल्यामुळे एकूण जनावरांच्या तुलनेत बैलांची संख्या ३८ टक् क्यावर आली आहे. बैलांची संख्या घटत असल्याने जिल्ह्यात केवळ २ लाख ६५ हजारच बैल उरले आहेत.
ब्रम्हानंद जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात गाय, बैल व म्हैस अशी एकूण ६ लाख ९0 हजार जनावरे आहेत. आधुनिक शेतीची कास धरणार्या शे तकर्यांच्या दावणीलाही आता बैलांएवजी ट्रॅक्टर दिसत असल्यामुळे एकूण जनावरांच्या तुलनेत बैलांची संख्या ३८ टक् क्यावर आली आहे. बैलांची संख्या घटत असल्याने जिल्ह्यात केवळ २ लाख ६५ हजारच बैल उरले आहेत.
बैलांच्या भरवशावर केली जाणारी शेती आता आधुनिकीरणामुळे ट्रॅक्टरवर आली आहे. शेतीत यांत्रिकीकरण वाढत असल्याने बैलांची संख्या घटली आहे. चारा टंचाई, बैलांच्या किमती, त्यांना पोसण्यासाठी येणारा खर्च शेतकर्यांच्या आवाक्याबाहेर गेला असल्याने बैलांची संख्या मोठय़ा प्रमाणावर घटली आहे. शेतातील नांगरणी, कुळपणी, पेरणी, मळणी यासारखी अनेक कामे करण्यासाठी ट्रॅक्टरसारख्या यंत्राचा वापर केला जात आहे. त्यामुळे इतर जनावरांच्या तुलनेत जवळपास ३८ टक्केच बैलांची संख्या उरली आहे. सन २00३, २00७ व २0१२ या वर्षी झालेल्या पशुगणनेनुसार बैलांची संख्या हजारोने कमी होत असल्याचीच आकडेवारी समोर आली आहे. जिल्ह्यात सध्या गाय, म्हैस व बैल अशी एकूण जनावरे ६ लाख ९0 हजार आहेत. त्यापैकी म्हशी १ लाख ५0 हजार, गायी २ लाख ७५ हजार व बैल २ लाख ६५ हजार आहेत. यावरून जिल्ह्यातील बहुतांश शेतकर्यांकडे बैलजोडी नसल्याचे दिसून येत आहे. शेतीत वाढते यांत्रिकीकरण, सालगड्यांची टंचाई, चाराटंचाई, बैलांच्या वाढत्या किमती, एकत्र कुटुंबपद्धती कमी झाल्याने अल्पभूधारक बनलेल्या शेतकर्यांना बैलजोडी ठेवण्यास परवडत नाही. त्यामुळे शेतीसाठी काही शे तकर्यांनी मिनी ट्रॅक्टर खरेदी केले आहेत. तर काही शेतकरी शे तीच्या कामासाठी ट्रॅक्टर भाड्याने आणून कामे पूर्ण करत आहेत.
पोळ्याला कृत्रिम बैलांची पूजा
पूर्वी ग्रामीण भागात घरोघरी बैलजोडी असायची. त्यामुळे बैल पोळ्याच्या दिवशी या बैलांची गावातून मिरवणूक काढल्यानंतर प्र त्येक घरी बैलांची पूजा केली जात होती; मात्र आता शेतकर्यांकडे बैलजोडीच राहिली नसल्याने बैलांच्या पोळा सणाला शेतकर्यांना मातीच्या तथा कृत्रिम बैलांची पूजा करावी लागणार आहे.
ट्रॅक्टरचा पोळा भरवण्याची प्रथा
अल्पभूधारक शेतकर्यांनाही शासनाकडून अनुदानावर मिनी ट्रॅ क्टर वाटप केल्या जात आहे. त्यामुळे मोठे शेतकरीच नव्हे तर अल्पभूधारक शेतकर्यांच्या दारातही ट्रॅक्टर उभे दिसत आहे. बैलाची जागा ट्रॅक्टरने घेतल्याने बैलांचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात मेहकरसह काही गावांमध्ये ट्रॅक्टरचा पोळा भरविण्याचा प्रथा रूढ होत असल्याचे दिसून येत आहे.