बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सुर्यफुल, तीळ, मुंग पिकाकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 04:21 PM2018-04-12T16:21:46+5:302018-04-12T16:21:46+5:30
बुलडाणा : जिल्ह्यात पूर्वी उन्हाळ्यामध्ये सुर्यफुल, तीळ, मुंग ही उन्हाळी पिके म्हणून घेतली जात होती. मात्र, काही वर्षात शेतक ऱ्यांनी या पिकांकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.
बुलडाणा : जिल्ह्यात पूर्वी उन्हाळ्यामध्ये सुर्यफुल, तीळ, मुंग ही उन्हाळी पिके म्हणून घेतली जात होती. मात्र, काही वर्षात शेतक ऱ्यांनी या पिकांकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. उन्हाळी पिकांना पाण्याची कमतरता पडत असल्याने हे पिके जगविणे अडचणी जाते. त्यामुळे जिल्ह्यात सुर्यफुल, तीळ व मुंग या पिकांची फक्त ४०.४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मका, भुईमुंग या पिकाबरोबरच सुर्यफुल, तीळ व मुंग या पिकांचीही पेरणी केल्या जाते. पाण्याची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांकडून उन्हाळी भुईमुंग या पिकाला पसंती आहे. जिल्ह्यात उन्हाळी पिकांमध्ये भुईमुंग पिकाचे ९६० हेक्टर क्षेत्रावर कृषी विभागाने नियोजन केले होते. त्यापैकी जिल्ह्यात ९७४ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी भुईमुंग पिकाची पेरणी झाली आहे. तर मका पिकांचीही ८६१ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे उद्दिष्टापैक्षा जास्त पेरणी झालेली आहे. परंतू यातील सुर्यफल, तीळ व मुंग या उन्हाळी पिकाला शेतकरी पसंती देत नसल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. उन्हाळी सुर्यफुल या पिकाचे नियोजित क्षेत्र ३४० हेक्टर असून केवळ ४.४ हेक्टर क्षेत्रावर सुर्यफुलाची पेरणी झाली आहे. त्यामध्ये चिखली तालुक्यात १ हेक्टर, बुलडाणा तालुक्यात ०.४ हेक्टर व नांदुरा तालुक्यात केवळ ३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. उन्हाळी तिळाची पेरणी ही केवळ मलकापूर तालुक्यात ८ हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली आहे. उन्हाळी मुंग पिकाची पेरणी मेहकर तालुक्यात चार हेक्टर व नांदुरा तालुक्यात २४ हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली आहे. या पिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळत नसल्यामुळे दरवर्षी पिकांचे नुकसान होते. सुर्यफुल, तीळ, मुंग या पिकाला उन्हाळ्यात पाण्याची जास्त गरज लागते. परंतू सध्या वाढते उन व त्यामध्ये पिकांना मिळणा ऱ्या पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने हे पिके जगविणे शेतक ऱ्यांना अवघड होते. उन्हाच्या झळा व पाण्याच्या कमतरतेमुळे बहुतांश शेतकरी उन्हाळी पिके घेणे टाळत आहेत.
९७४ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी भुईमुंग
जिल्ह्यात उन्हाळी भुईमुंगाचे क्षेत्र ९६० हेक्टर असून त्यापैकी ९७४ हेक्टर क्षेत्रावर भुईमुंगाची पेरणी करण्यात आली आहे. त्यामध्ये जळगाव जा. तालुक्यात १२० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. चिखली तालुक्यात १६६ हेक्टर, बुलडाणा तालुक्यात १६ हेक्टर, देऊळगाव राजा तालुक्यात १४७ हेक्टर, मेहकर तालुक्यात ४०१ हेक्टर, लोणार तालुक्यात १७.५, खामगाव तालुक्यात ६० हेक्टर, मलकापूर तालुक्यात २१ हेक्टर, मोताळा तालुक्यात १४.५ हेक्टर व नांदुरा तालुक्यात ११ हेक्टर क्षेत्रावर भुईमुंगाची पेरणी करण्यात आली आहे.