पिक विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 02:07 PM2019-11-15T14:07:41+5:302019-11-15T14:07:58+5:30
सीएससी सेंटर चालकाने विमा हप्त्याची रक्कम विमा कंपनीकडे भरली नसल्यामुळे ३५७ शेतकरी पिक विम्यापासून पासून वंचित राहिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपुर : अस्मानी संकटे झेलणाºया बळीराजावर संकटांची मालिका थांबता थांबत नसल्याने करावे तरी काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पिक विम्याच्या नावाखाली एका शेतकºयाने फसवणूक झाल्याची तक्रार पोलिस स्टेशनला सादर केली आहे.
पाण्यामुळे सर्वच पिके उध्वस्त झाल्याने येथील शेतकरी देशोधडीला लागला. निसर्गापुढे हतबल झालेल्या बळीराजाचे आवाज शासन दरबारी पोहचत नसल्याचे चित्र असतांना आता पिक विम्यापासुन वंचित राहण्याची वेळ शेतकय्रांवर आली आहे. संग्रामपुर तालुक्यातील असंख्य शेतकय्रांनी सिएससी सेंटर वर १३ जुलै २०१८ रोजी पिक विम्याचा हप्ता भरला असता सेंटर चालकाकडुन रितसर शेतकय्रांना पैसे भरल्याचे पावती देण्यात आली. यावरून बराच अवधी उलटुन गेला. हवामानावर आघारीत पिक विमा असल्याने शासकीय निकशानुसार सदर पिक विमा लागू झाला. पिक विमा कंपणीकडुन बहुतांश शेतकºयांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा करण्यात आली तर असंख्य शेतकरी पिक विम्याच्या लाभापासुन वंचित राहले. हप्ता भरल्यावर देखिल लाभ मिळत नसल्याने शेतकºयांनी पिक विमा कंपनीकडे याबाबत जाब विचारला. कंपनीने या प्रकरणा संबधी चौकशी केली असता वंचित शेतकय्रांनी पिक विम्याचा हप्ता भरला नसल्याचे निदर्शनात आले.
त्यामुळे कंपणीने विम्याची रक्कम देण्यास नकार दिल्याने बनावट पावती आधारे आपली फसवणुक झाल्याचे आरोप शेतकय्रांनी केले. पिक विम्याच्या हप्त्याची रक्कम ही व लाभापासुन वंचित राहावे लागले असल्याने १४ नोव्हेंबर शेतकºयांनी तामगाव पोलिस गाठत फसवणुक झाली असल्याचे निवेदन दिले. संग्रामपुर तालुक्यातील पातुर्डा येथील सीएससी सेंटर चालक धिरज चांडक व केतन चांडक यांनी फसवणुक केली असल्याचे निवेदनात नमुद आहे. दोघांवर कठोर कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्याचा ईशारा या निवेदनातुन करण्यात आला. निवेदनावर शेतकरी संघटनेचे रमेश बनाईत, हमीद पाशा, श्रीराम मिसाळ आदींच्या सह्या आहेत.
शेतकºयांच्या फसवणुक संदर्भात पोलिस स्टेशनला निवेदन प्राप्त झाले असुन या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
- भुषण गावंडे
ठाणेदार तामगाव पोलिस स्टेशन
संग्रामपूर तालुक्यातील शेतकºयांनी पातुर्डा येथील सीएससी सेंटर वरून खरीप पिकाचा २०१८ मध्ये विमा उतरला होता. सीएससी सेंटर चालकाने विमा हप्त्याची रक्कम विमा कंपनीकडे भरली नसल्यामुळे ३५७ शेतकरी पिक विम्यापासून पासून वंचित राहिले. सीएससी संचालकांविरुद्ध कारवाई करून शेतकºयांना न्याय मिळवून द्यावा.
- रमेश बानाईत, जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना बुलढाणा